शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Beed Crime: धक्कादायक! पाचवीच्या वर्गातील मुलीचा तासाभरात दोनदा विवाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 16:25 IST

बीडमधील प्रकार : पहिला नवरदेव पळाला, दुसरा पाठलाग करून पकडला

बीड : शाळेत जाण्याची तयारी करणाऱ्या पाचवीच्या वर्गातील मुलीचा तासाभरातच दोन वेळा विवाह लावल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. तक्रारीची कुणकुण लागताच पहिला नवरदेव पळून गेला, तर दुसऱ्याला नवरीला घेऊन जात असताना शिवाजीनगर पोलिस ठाण्यासमोर पकडण्यात आले. रात्री ९ वाजता दोन नवरदेवांसह त्यांचे नातेवाईक व मुलीचे आई-वडील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सोनिया (नाव बदलले, रा. बीड) ही अवघ्या १३ वर्षांची आहे. नुकतीच ती पाचवी पास झाली असून, सोमवारपासून सहावीच्या वर्गात जाण्यासाठी तयार होती. तिला वडील आणि सावत्र आई आहे. परंतु, त्यांनी सोनियाचे लग्न आधीच दोन विवाहासह दोन मुलांचा बाप असलेल्या सुलेमान पठाण (२५, रा. बेलखंडी पाटोदा, ता. बीड) याच्यासोबत जुळवले. गुरुवारी सकाळी ८ वाजताच शाहूनगर भागातील घरात विवाह लावला. त्याचे फोटोही काढले; परंतु सुलेमानच्या पत्नीने तक्रार केली. याची कुणकुण सुलेमानला लागली. त्यामुळे त्याने आपल्या बहिणीच्या गावच्या आसेफ शेख (रा. खांडवी, ता. गेवराई) याला तेथे पाठवले आणि स्वत: पळून गेला. त्यानंतर मुलीचा विवाह आसेफबरोबर झाला. त्या विवाहाचे फोटोही काढले. या प्रकरणात कोणाला संशय येऊ नये, म्हणून आसेफ हा नवरीला घेऊन जात होता. ही माहिती सामाजिक कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे यांना मिळाली. त्यांनी लगेच पोलिस यंत्रणेशी संपर्क साधून त्यांना बार्शी रोडवर पकडले. या सर्वांना शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आणल्यावर रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. यातील पीडितेला बालकल्याण समितीसमोर हजर केले जाणार आहे. अध्यक्ष अशोक तांगडे हेदेखील पोलिस ठाण्यात पोहोचले होते.

गुरुवारीच निघाले अटक वॉरंटसुलेमानला पहिल्या बायकोपासून एक मुलगी आहे. त्यांच्यात वाद झाले असून, न्यायालयात प्रकरण सुरू आहे. याच प्रकरणात त्याला गुरुवारी अटक वॉरंट निघाल्याचे पत्नीने सांगितले होते. दुसरी पत्नीही त्याच्या नात्यातील असून, तिला मुलगा आहे. अगोदर दोन बायका असतानाही सुलेमान याने अवघ्या १३ वर्षांच्या मुलीसोबत तिसरा विवाह केल्याचे सांगण्यात आले.

प्रशासनाने सहकार्य केले नाहीबालविवाहाची माहिती मिळताच पाेलिसांना सांगितले. पाचवीच्या वर्गातील मुलीचे दोन विवाह झाल्याचे समोर आले. परंतु, यात गुन्हा दाखल करण्यासाठी प्रशासनाने सहकार्य केले नाही. टोलवाटोलवी केली. अशाने बालविवाह कसे थांबतील, हा प्रश्न आहे.-तत्त्वशील कांबळे, सामाजिक कार्यकर्ते, बीड

नातेवाइकांविरोधात तक्रारया प्रकरणात सुलेमान पठाण आणि आसेफ शेख यांच्यासह मुलीचे व दोन्ही मुलांच्या नातेवाइकांविरोधात तक्रार दिली आहे. त्यांना बालकल्याण समितीसमोर हजर केले जाणार आहे.-मन्सुरी अन्सार अहमद, तालुका संरक्षण अधिकारी, महिला व बालविकास कार्यालय, बीड

टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याmarriageलग्न