शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

१० दिवसांत दुसरा गुन्हा! परळीत १२ वर्षांच्या मुलीवर अत्याचार, दोन अल्पवयीन आरोपी ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 16:07 IST

रात्रीच्या वेळी घरी परतताना दुर्दैवी घटना; परळीत चिमुकलीवर अत्याचाराने बीड जिल्हा हादरला

परळी :शहरातील एका भागात बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. सात सप्टेंबरच्या रात्री ही घटना घडली असून याप्रकरणी नऊ सप्टेंबर रोजी संभाजीनगर पोलीस ठाण्यात पहाटे चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी दोघा अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  दरम्यान 31 ऑगस्ट रोजी परळीच्या रेल्वे स्थानक परिसरात एका चिमुरडीवर अत्याचाराची घटना घडली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, सात सप्टेंबर रोजी रात्रीच्या वेळी पीडित मुलगी दुकानावरून घराकडे परत येत असताना  15 व 16 वर्षाच्या दोघा मुलांनी तिचा हात धरून अंधारात पानंदमध्ये नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या इतर दोन साथीदारांनी पीडितेला धमकावून आरोपींना मदत केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पीडितेच्या आईने  8 सप्टेंबर रोजी रात्री दिलेल्या तक्रारीनंतर 9 सप्टेंबर रोजी पहाटे चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हे विधी संघर्ष गस्त बालक  असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. तर दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.

घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे, संभाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय ढोणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल शिंदे तसेच अंबाजोगाई येथील पिंक पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधवर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

परळी पुन्हा हादरलेदरम्यान, अवघ्या १० दिवसांपूर्वीच परळी रेल्वे स्थानक परिसरात एका चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडली होती. त्यानंतर शहरातील   दुसऱ्या भागात  अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याने परळी शहर हादरून गेले असून नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या