शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 13:19 IST

Beed Crime: दोन्ही प्रकरणांमध्ये दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मुलांनीच आई आणि चुलतीचा जिव घेतल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. 

बीड: दारूच्या नशेत आई आणि चुलतीची निर्घृण हत्या झाल्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांनी संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील येल्डा गावात मुलाने आईचा तर परळी तालुक्यातील कावळ्याची वाडी येथे पुतण्याने चुलतीचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मुलांनीच आई आणि चुलतीचा जिव घेतल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. 

पहिली घटना : आईचा दगडाने ठेचून खूनअंबाजोगाई तालुक्यातील येल्डा येथे रात्री बारा वाजताच्या सुमारास अमृत भानुदास सोन्नर (वय 45) याने आपल्या आई चोत्राबाई भानुदास सोन्नर (वय अंदाजे 72) यांचा दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून वाद घालून दगडाने ठेचून खून केला. अमृतला दारूचे व्यसन होते, आणि काही दिवसांपूर्वी पत्नी व मुले त्याच्या त्रासाला कंटाळून माहेरी गेली होती. त्या रात्री आई व मुलगा दोघेच घरी असताना, अमृतने आईकडे पैसे मागितले. पैसे न दिल्याने त्याने रागाच्या भरात आईच्या अंगावर दगडांनी प्रहार केला. जबर मारहाणीमुळे रक्तस्त्राव होऊन वृद्धेचा जागीच मृत्यू झाला. अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी अमृतला अटक केली आहे.

दुसरी घटना : कुन्हाडीने चुलतीची हत्यादुसरी घटना परळी तालुक्यातील कावळ्याची वाडी येथे 1 मे रोजी संध्याकाळी 6 वाजता घडली. चंद्रकांत धुराजी कावळे (वय 25) याने आपल्या चुलती परिमाला बाबुराव कावळे (वय 65) यांच्याकडे दारूसाठी पैसे मागितले. पैसे न दिल्याने त्याने संतापून घरात असलेल्या कुन्हाडीने चुलतीवर सपासप वार केले. डोक्यावर आणि अंगावर गंभीर घाव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर चंद्रकांतने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु आहे.

दारूमुळे गुन्हेगारी वाढलीया दोन घटनांमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून, दारू विक्री आणि व्यसनाधीनतेमुळे होणाऱ्या कुटुंबीयांवरील अत्याचारांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ग्रामीण भागात बिनधास्त चालणारी दारू विक्री आणि तिच्याशी संबंधित गुन्हेगारी यामुळे अनेक गंभीर गुन्हे घडत आहेत.

टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याBeedबीडCrime Newsगुन्हेगारी