शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

माजलगावात दोन बहिणींच्या अपहरणाचा थरार; नागरिकांनी जीव धोक्यात घालून केली सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 14:04 IST

बीड हादरले! गेवराईनंतर आता माजलगावात मुलींचे अपहरण करण्याचा प्रयत्न; तिघे ताब्यात

माजलगाव : माजलगाव शहरातील आंबेडकर चौक परिसरात सोमवारी दुपारी दोन सख्ख्या बहिणींचे अपहरण करण्याचा धक्कादायक प्रयत्न झाला. मात्र, स्थानिक नागरिकांनी दाखवलेली समयसूचकता आणि तरुणांनी केलेल्या धाडसी पाठलागामुळे अपहरणकर्त्यांचा डाव फसला. पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून, शहरात या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. यापूर्वीही गेवराईत एका तरुणीचे भर दिवसा अपहरण करण्यात आले होते. वाढत्या घटनांवरून मुली असुरक्षित असल्याचे दिसत असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अंबाजोगाई येथील रहिवासी असलेल्या दोघी बहिणी परळी तालुक्यातील पोहनेर येथून माजलगावला आल्या होत्या. बहीण ही बीड येथील महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. ती आजारी असल्यामुळे उपचारासाठी या दोन्ही बहिणी आपल्या मावसभावासोबत स्कुटीवरून माजलगाव येथील एका खासगी रुग्णालयात आल्या होत्या. दुपारी १२ च्या सुमारास दवाखान्यातून बाहेर पडल्यानंतर, बायपास परिसरात एका हुंह्याई औरा (एमएच १२ डब्ल्यूएक्स ४१६७) या चारचाकी वाहनाने त्यांना अडवले. या गाडीतील व्यक्तींनी दोन्ही बहिणींना जबरदस्तीने गाडीत ओढले आणि गाडी लॉक करून शहराच्या दिशेने वेगाने पळ काढला; परंतु नागरिकांच्या सतर्कतेमुळे एका मोठ्या अनर्थाला वेळीच रोखण्यात यश आले असून, माजलगाव शहर पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

नागरिकांची सतर्कता अन् थरारक पाठलागअपहरणकर्त्यांची गाडी छत्रपती शिवाजी चौक ओलांडून आंबेडकर चौकच्या दिशेने जात असताना, संभाजी चौकातील काही तरुणांना गाडीत संशयास्पद हालचाली दिसल्या. एका तरुणीला बळजबरीने नेले जात असल्याचे लक्षात येताच काही तरुणांनी दुचाकीवरून या गाडीचा थरारक पाठलाग सुरू केला. अखेर आंबेडकर चौकातील पंचवटी हॉटेलजवळ नागरिकांनी ही गाडी अडवून धरली. यावेळी परिसरात झालेल्या आरडाओरडीमुळे मोठी गर्दी जमा झाली आणि रस्ता पूर्णपणे जाम झाला.

आरोपींना घेतले ताब्यातघटनेची माहिती मिळताच माजलगाव शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मुलींची सुटका करून गाडीतील तीन तरुणांना ताब्यात घेतले आणि पोलिस ठाण्यात नेले. याप्रकरणी भाग्यश्री हजारे यांच्या फिर्यादीवरून दिनेश पुरुषोत्तम देवकते (रा. येल्डा), मजहर सिकंदर सय्यद (रा. अंबाजोगाई), रवी बिभीषण निळे (रा. चौथाईवाडी, अंबाजोगाई) यांच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेवराईतही तरुणीचे अपहरणकाही दिवसांपूर्वी गेवराई शहरातूनही एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे भर दिवसा अपहरण करण्यात आले होते. याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले होते. ही मुलगी नंतर परभणीत सापडली होती. ही घटना ताजी असतानाच पुन्हा माजलगावात असाच थरार पाहायला मिळाला. यावरून पोलिसांचा वचक आहे की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Majalgaon: Sisters' abduction foiled by brave citizens; three arrested.

Web Summary : Brave citizens foiled an abduction attempt of two sisters in Majalgaon. Three suspects were arrested after a thrilling chase. This incident raises concerns about women's safety following a similar incident in Gevarai.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याBeedबीडKidnappingअपहरण