शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Beed Crime: अपहरण अन् मारहाण; पत्नीसोबत अनैतिक संबंधाच्या संशयातून मित्राला संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 18:04 IST

अपहरण करून शेतात नेले, झाडाला बांधून सात जणांनी केली अमानुष मारहाण

- मधुकर सिरसटकेज ( बीड) : पत्नीसोबत अनैतिक संबंधांच्या संशयावरून मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. दगडू दत्तात्रय धपाटे ( २७ ) असे मृत तरुणाचे नाव आहे. दगडू यास त्याच्या मित्राने सोमवारी दुपारी शेतातील झाडाला बांधून इतर सहा जणांच्या मदतीने काठी, बेल्टने बेदम मारहाण करून पवनधाम मंदिराच्या परिसरात फेकून दिले होते. उपचारादरम्यान अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दगडू याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. 

केज तालुक्यातील भाटुंबा येथील दगडू उर्फ आण्णा उर्फ ज्ञानेश्वर दत्तात्रय धपाटे हा सोमवारी (दि. 26 )  सायंकाळी साडेचार वाजता मित्र सचिन करपे सह दुचाकीवरून जात होता. यावेळी सावळेश्वर (पैठण) येथील रोहन उर्फ रोहित मस्के, वैभव उर्फ सोन्या मस्के व लाडेगाव येथील सुहास पाटोळे, राजेश जंगले, अन्वर पठाण, रोहित धिरे, आशिष अंबाड यांनी त्यांची दुचाकी अडवली. दोघांनाही रोहन मस्केच्या मामाच्या शेतात नेऊन एका झाडाला बांधले. यानंतर सात ते आठ जणांनी काठी आणि बेल्टने अमानुष मारहाण केली. त्यानंतर दगडू धपाटे आणि सचिन करपे या दोघांना गंभीर जखमी अवस्थेत औरंगपूर शिवारातील पावनधाम मंदिर परिसरातील रस्त्याच्या कडेला फेकून दिले. दरम्यान, एका मारेकऱ्याने दगडूच्या भावाला याची माहिती दिली. यावरून काही वेळातच सिद्धेश्वर धपाटे आणि गावकऱ्यांनी दगडू धपाटे आणि त्याचा मित्र सचिन करपे या दोघांनाही अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असताना काही वेळातच दगडूचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. तर सचिन करपे याचेवर तेथेच उपचार सुरु आहेत. 

मित्रानेच संपवले सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिन्द्रनाथ शेंडगे, पोलीस उपनिरीक्षक राहुल पतंगे यांनी नातेवाईकांचे जवाब नोंदविले. दरम्यान, वैभव उर्फ सोन्या मस्के यास दगडूचे त्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. यातूनच वैभव याने त्याचा भाऊ रोहन आणि इतर पाच जणांना सोबत घेत दगडू आणि सचिन यांचे अपहरण केले. शेतातील झाडाला बांधून बेदम मारहाण केल्याने दगडू याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सहा आरोपी अटकेत, एक फरारया प्रकरणी मयताचा भाऊ सिद्धेश्वर धपाटे याच्या फिर्यादीवरून युसुफवडगाव पोलिस ठाण्यात मंगळवारी दुपारी सात जणांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत रोहन उर्फ रोहित मस्के, वैभव उर्फ सोन्या मस्के रा सावळेश्वर (पैठण), सुहास पाटोळे, राजेश जंगले, अन्वर पठाण, रोहित धीरे, तिघेही रा लाडेगाव या सहा आरोपींना त्यांच्या घरातून व शेतातून जेरबंद केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिन्द्रनाथ शेंडगे यांनी लोकमतशी बोलताना दिली. दरम्यान या प्रकरणातील आशिष अंबाड रा लाडेगाव हा अद्याप फरार आहे.

टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याBeedबीड