शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जमिन, ट्रॅक्टरसाठी मुलाची वडिलांना बेदम मारहाण, हातपाय बांधून तलावात टाकण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 18:44 IST

क्रूरतेचा कळस! वडिलांसोबतच डोळ्यात चटणी टाकून बहीण-मेहुण्याला मारहाण; केजमधील घटना.

केज (जि. बीड): तालुक्यातील नाव्होली येथे जमीन आणि ट्रॅक्टर स्वतःच्या नावावर करण्यासाठी एका मुलाने आपल्या जन्मदात्या पित्यासह बहीण आणि मेहुण्याला अमानुष मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. संतापलेल्या मुलाने वडिलांचे हातपाय बांधून त्यांना चक्क तलावात फेकून देऊन मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात १० जणांविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

अंगावर चटणी टाकून अमानुष मारहाणमिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण ठोंबरे हा त्याच्या वडिलांपासून विभक्त राहतो. शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास तो सासरच्या मंडळींना सोबत घेऊन नाव्होली येथे आला. त्याने वडील सुभाष ठोंबरे यांना ट्रॅक्टरची चावी मागितली आणि जमीन नावावर करून देण्याचा तगादा लावला. वडिलांनी नकार देताच लक्ष्मण आणि त्याच्या सासरच्या लोकांनी लोखंडी रॉड, बेल्ट आणि काठीने मारहाण सुरू केली. यावेळी मध्यस्थी करणाऱ्या बहीण आणि मेहुण्याच्या डोळ्यात चटणी टाकून त्यांनाही बेदम मारहाण करण्यात आली.

तलावात टाकण्याचा थरारअंगावर शहारे आणणारी बाब म्हणजे, मारहाण केल्यानंतर आरोपींनी वडिलांचे हातपाय बांधले आणि त्यांना जीपमध्ये टाकून तलावाकडे नेले. त्यांना तलावात फेकून देण्याचा त्यांचा डाव होता, मात्र काही कारणास्तव तेथून परत आणून त्यांना घरी सोडले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्यांवर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अशोक सोनवणे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Son assaults father for land, tractor; attempts drowning.

Web Summary : In Beed, a son brutally beat his father, sister, and brother-in-law over land and a tractor. He tied his father up and tried to drown him in a lake. Police have registered a case against ten people.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याBeedबीड