शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

शाळा बदलली तरी पाठलाग थांबेना! ट्रॅक्टर चालकाच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 18:01 IST

वर्षभरापासून करत होता पाठलाग; चिंचोलीमाळी येथील विद्यार्थिनीच्या आत्महत्येने केज तालुक्यात खळबळ

केज (जि. बीड): तालुक्यातील चिंचोलीमाळी येथील मगर वस्तीवर राहणाऱ्या अनुजा सूर्यकांत मावकर (वय १५) या विद्यार्थिनीने मंगळवारी (७ एप्रिल) रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. नुकतीच दहावीची परीक्षा दिलेल्या अनुजाचा गावातीलच अक्षय भगवान काळे (वय २७) हा ट्रॅक्टर चालक गेल्या एक वर्षापासून सतत पाठलाग करून तिला मानसिक त्रास देत होता. या छळाला कंटाळून अनुजाने टोकाचे पाऊल उचलले. बुधवारी अनुजाचे वडील सूर्यकांत मावकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून केज पोलिसांनी आरोपी अक्षय काळेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शाळा बदलली तरी छळ सुरूचअनुजा गेल्या वर्षी नववीत असतानापासूनच अक्षय काळे तिचा पाठलाग करत होता. या त्रासामुळे तिच्या नातेवाईकांनी तिला दहावीसाठी केज येथील सरस्वती कन्या शाळेत प्रवेश मिळवून दिला होता आणि तिची राहण्याची सोय वारकरी शिक्षण संस्थेत केली होती. मात्र, नराधम अक्षय तिथेही तिचा पाठलाग करत होता. मंगळवारी सायंकाळी अनुजाचे आई-वडील शेतात गेलेले असताना अक्षयने मगर वस्तीवर येऊन पुन्हा तिला बोलण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे अनुजा प्रचंड तणावाखाली होती.

रात्री १० वाजता संपवली जीवनयात्रामंगळवारी रात्री सर्वांचे जेवण झाल्यानंतर अनुजाने आपल्या खोलीत जाऊन आतून कडी लावून घेतली आणि ओढणीच्या सहाय्याने छताच्या हुकला गळफास घेतला. रात्री ११ वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस येताच कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पार्थिव केज उपजिल्हा रुग्णालयात हलवले. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Stalking Continues After School Change: Student Ends Life

Web Summary : A 15-year-old girl in Beed, harassed by a tractor driver for a year, committed suicide. Despite changing schools to escape the stalker, the harassment persisted, leading to her tragic death. Police have registered a case against the accused.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याStudentविद्यार्थी