शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Beed Crime: जातपंचायतीच्या दंडाच्या रकमेवरून वाद; २०० रुपयांसाठी गेला मजुराचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 18:33 IST

या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

सिरसाळा: अवघ्या २०० रुपयांच्या क्षुल्लक वादातून झालेल्या धक्काबुक्कीत एका ४० वर्षीय मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सिरसाळा येथील मसनजोगी वस्तीत घडली आहे. संजू गंगाराम उबदे (वय ४०) असे मृत व्यक्तीचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिरसाळा येथील मसनजोगी वस्तीत राहणारे सायलू रामलू पस्तमवाड आणि गंगा पस्तमवाड यांचा संजू उबदे यांच्याशी पैशांच्या कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, सायलू आणि गंगा यांनी संजू उबदे यांना पाठीवर जोरात धक्का दिला. या धक्क्यामुळे संजू यांचा तोल गेला आणि ते तोंडावर जमिनीवर आदळले. यात त्यांच्या डोक्याला व तोंडाला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. संजू उबदे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच सिरसाळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी परळी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी सायलू पस्तमवाड याच्यासह आणखी एकाला ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

जातपंचायतीतील दंड ठरला वादाचे मूळया हत्येच्या घटनेमागे 'जातपंचायती'ची पार्श्वभूमी असल्याचे समोर आले आहे. एका अनैतिक संबंधाच्या प्रकरणावरून सिरसाळ्यात जातपंचायत बसली होती. या पंचायतीत संबंधितांना ९० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. ही दंडाची रक्कम समाजबांधवांमध्ये वाटण्यात आली होती. मात्र, या वाटणीतील आणि एकमेकांना दिलेल्या उसने पैशांच्या हिशेबावरून (अंदाजे २०० रुपये) संजू उबदे यांचा पस्तमवाड यांच्याशी वाद झाला आणि त्यातच त्यांचा जीव गेला.

English
हिंदी सारांश
Web Title : Beed: Caste Panchayat fine dispute leads to laborer's death over ₹200.

Web Summary : In Sirsala, a ₹200 dispute over a caste panchayat fine led to the death of a 40-year-old laborer, Sanju Ubade. He died after being pushed during an argument. Police have arrested two suspects. The dispute stemmed from money owed after a prior caste panchayat ruling regarding an affair and a fine of ₹90,000.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याBeedबीड