शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Beed: केज हादरलं! कारमध्ये सापडलं शस्त्रांचं भांडार; ५ अट्टल दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 17:45 IST

केज पोलिसांनी उधळला दरोड्याचा कट; ५ आरोपींना शस्त्रास्त्रांसह रंगेहात पकडले

मधुकर सिरसटकेज (बीड): शुक्रवारी पहाटेच्या वेळी जेव्हा संपूर्ण जिल्हा गाढ झोपेत होता, तेव्हा युसूफवडगाव पोलिसांनी आपल्या सतर्कतेने एका मोठ्या दरोड्याचा कट उधळून लावला आहे. सावळेश्वर शिवारात महामार्गावर गस्तीवर असलेल्या पोलिसांनी एका लाल रंगाच्या कारला संशयावरून अडवले आणि त्यातून दरोड्याचे भयंकर साहित्य जप्त करत ५ अट्टल दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या.

सावळेश्वर ते अंबाजोगाई या महामार्गावर पहाटे साडेतीनच्या सुमारास एक लाल रंगाची एक कार (MH-14 CK-7917) संशयास्पद रितीने धावताना गस्ती पथकाला दिसली. पोलिसांनी गाडी थांबवून विचारपूस केली असता, गाडीतील तरुणांच्या बोलण्यात विसंगती आढळली. पोलिसांनी गाडीची सखोल झडती घेतली असता, त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. गाडीत दरोडा टाकण्यासाठी लागणारे शस्त्रास्त्रांचे भांडार सापडले.

शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त या कारवाईत पोलिसांनी महादेव काळे, रितेश काळे, सुरेश शिंदे, रमेश पवार आणि बालाजी शिंदे (सर्व रा. ता. वाशी, जि. धाराशिव) यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ४ लाख रुपये किमतीची कार, धारदार तलवार, कोयता, लोखंडी गज, रॉड आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

पोलीस कोठडीत मोठी माहिती मिळण्याची शक्यता जमादार अनिल बिक्कड यांच्या फिर्यादीवरून युसूफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी या पाचही आरोपींना केज न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने यापूर्वी कुठे दरोडे टाकले आहेत किंवा त्यांचा पुढचा निशाणा कोण होता, याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्र शेंडगे करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Beed: Kej shaken! Arsenal of weapons found; 5 arrested

Web Summary : Police in Kej, Beed, foiled a robbery plot, arresting five notorious criminals. A car carrying weapons was intercepted near Sāvaleshwar, revealing a cache of dangerous materials. Further investigation is underway.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याRobberyचोरी