शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

बीड एसीबीचा लाचखोरांना 'डबल' झटका; तलाठी अन् ग्रामसेवक जाळ्यात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 16:50 IST

केजमध्ये वारस नोंदीसाठी ९ हजार, तर परळीत विहीर बिलासाठी ५०० रुपये घेताना रंगेहाथ पकडले

बीड: जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी एकाच दिवशी दोन धडाकेबाज कारवाया करून भ्रष्ट महसूल आणि ग्रामविकास प्रशासनाला मोठा धक्का दिला आहे. केज तालुक्यात एका तलाठ्याला ९ हजार रुपये, तर परळी तालुक्यात एका ग्रामसेवकाला ५०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली.

पहिली कारवाई: केज तालुक्यात माजी सैनिक असलेला तलाठी जाळ्यातकेज तालुक्यातील दहिफळ (वडमाऊली) येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) परमेश्वर अभिमान जाधव (वय ४७) याला ९ हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले. तक्रारदाराच्या वारसाप्रमाणे सातबाऱ्यावर नोंदी करण्यासाठी जाधव याने ३५ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी ९ हजार रुपये कामाच्या अगोदर आणि उर्वरित पैसे काम झाल्यावर देण्याचे ठरले होते. विशेष म्हणजे, परमेश्वर जाधव हा माजी सैनिक असून निवृत्तीनंतर सहा महिन्यांपूर्वीच तलाठी म्हणून सेवेत रुजू झाला होता. नवीन नोकरीत अवघ्या सहा महिन्यातच तो एसीबीच्या जाळ्यात अडकला. ही कारवाई एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या पथकाने गावात जाऊन केली.

दुसरी कारवाई: परळीत विहीर बिलाच्या सहीसाठी ग्रामसेवक जेरबंदपरळी तालुक्यातील जिरेवाडी येथील ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) दशरथ देविदासराव गोरे याला ५०० रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले. जलसिंचन विहिरीच्या कुशल बांधकामाचे बिल काढण्यासाठी त्याने एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाचेची मागणी पंचायत समिती कार्यालय परिसरात करण्यात आली होती, मात्र त्यानंतर आपल्या खासगी कार्यालयात ५०० रुपये स्वीकारताना पोलीस निरीक्षक कवडे आणि त्यांच्या पथकाने गोरेला रंगेहाथ पकडले.

English
हिंदी सारांश
Web Title : Beed ACB Nets Two Bribe-Takers: Village Officer, Land Record Official Arrested

Web Summary : Beed ACB arrested a land record official for demanding ₹9,000 bribe in Kej, and a village officer caught accepting ₹500 in Parli, exposing corruption within local administration.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग