शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस दलात खळबळ! पुण्याहून तपास करून बीडला परताच अंमलदाराने आयुष्य संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 19:16 IST

६ एप्रिलला पुण्यात तपास, ७ ला घरी परत अन् मध्यरात्री गळफास; माजलगावच्या पोलीस अंमलदाराच्या मृत्यूचे गूढ वाढले.

बीड: माजलगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले ३५ वर्षीय पोलीस अंमलदार बाळकृष्ण जायभाये यांनी बुधवारी मध्यरात्री बीड शहरातील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. एका बेपत्ता मुलीच्या तपासासाठी ते ६ एप्रिल रोजी पुण्याला गेले होते. ७ एप्रिल रोजी रात्री उशिरा घरी परतल्यानंतर अवघ्या काही तासांतच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेत त्यांनी घराच्या खालच्या दरवाजाला बाहेरून कडी लावून घेतली होती, ज्यामुळे सुरुवातीला या मृत्यूबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते.

घटनास्थळावरील विदारक चित्र आणि संशयमिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास जायभाये यांनी घराच्या दुसऱ्या मजल्यावर जाणाऱ्या पायऱ्यांच्या लोखंडी गजाला दोरीने गळफास लावला. घटनास्थळी दरवाजाजवळ एक बॅट आणि जिन्याजवळ दोन पायऱ्या आढळून आल्या आहेत. गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा एक पाय जमिनीला टेकलेला तर दुसरा वाकडा होता. घराला बाहेरून कडी लावलेली असल्याने या घटनेमागे नेमके काय कारण आहे, याबाबत परिसरात मोठी चर्चा सुरू आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला गती दिली आहे.

पोलीस दलात हळहळ आणि तपासबाळकृष्ण जायभाये यांनी अशा पद्धतीने स्वतःला संपवल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांनी हे टोकाचे पाऊल कामाच्या तणावातून उचलले की अन्य काही वैयक्तिक कारण होते, याचा तपास पोलीस करत आहेत. "काहीही अडचण असेल तर ती सहकाऱ्यांशी किंवा वरिष्ठांशी बोलून सोडवावी," असे आवाहन पोलीस बॉइज संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले यांनी केले आहे. सध्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून, शवविच्छेदनानंतर अधिक माहिती समोर येईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Police Officer Suicide Shocks Beed: Pune Investigation Trip Preceded Tragedy.

Web Summary : A 35-year-old police officer in Beed, Maharashtra, tragically committed suicide at his home after returning from a missing person investigation in Pune. The circumstances, including a locked door and unusual scene, are under investigation. Colleagues are shocked, and the police are investigating the cause.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याPoliceपोलिस