माजलगाव ( बीड) : शहरातील बायपास रोडवर सोमवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास एका जीप मध्ये ठेवण्यात आलेले सहा लाख रुपये निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पकडल्याने एकच खळबळ उडाली. हे पैसे कोणाचे याबाबत शहरात उलट सुलट चर्चा सुरू आहे.
सोमवारी नगरपालिका-नगर परिषद प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने प्रत्येक उमेदवाराकडून प्रचाराचा वेग वाढला होता. संध्याकाळी साडेसात वाजता तुम्हाला बायपास रोड असलेल्या तबेल्या समोर एका जीपमध्ये पैसे वाटप केली जात असल्याची तक्रार निवडणूक निर्णय अधिकारी गौरव इंगोले यांना मिळाल्यानंतर त्यांनी सदर ठिकाणी जाऊन जीपची तपासणी केली असता त्यामध्ये सहा लाख रुपये सापडले. सापडलेली रक्कम जप्त केली असून हे वाहन कोणाचे आहे? पैसे कोणाचे होते? याची चौकशी जात आहे. दरम्यान, 17 तासानंतरही या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नव्हता.
हिशोब मागितलाजीपमध्ये सापडलेली रक्कम जप्त केली आहे. सदरील व्यक्तीस हिशोब देण्यास सांगितले आहे.- सुंदर बोंदर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी न.प. माजलगाव
Web Summary : ₹6 lakh was seized from a jeep in Majalgaon on the eve of elections. Election officials seized the cash after a tip-off. The source of the money and the owner of the jeep are under investigation. An investigation is ongoing.
Web Summary : माजलगाँव में चुनाव की पूर्व संध्या पर एक जीप से छह लाख रुपये जब्त किए गए। चुनाव अधिकारियों ने सूचना मिलने पर नकदी जब्त की। पैसे का स्रोत और जीप के मालिक की जांच चल रही है। जांच जारी है।