शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष रेखा फड यांच्यावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 01:13 IST

बीड : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करुन नौकरी घालवण्याची धमकी दिल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसची महिला आघाडीची जिल्हाध्यक्ष रेखा फड यांच्यासह सात महिलांवर शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सोमवारी दुपारी १२ वाजता हा प्रकार घडला. यापूर्वीही रेखा फड यांनी पोलिसांविरोधात भाष्य केले होते.राष्ट्रवादीची जिल्हाध्यक्ष रेखा फड यांच्या मार्गदर्शनाखाली ...

ठळक मुद्देपोलिसाला शिवीगाळ; नोकरी घालवण्याची दिली धमकी

बीड : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करुन नौकरी घालवण्याची धमकी दिल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसची महिला आघाडीची जिल्हाध्यक्ष रेखा फड यांच्यासह सात महिलांवर शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सोमवारी दुपारी १२ वाजता हा प्रकार घडला. यापूर्वीही रेखा फड यांनी पोलिसांविरोधात भाष्य केले होते.राष्ट्रवादीची जिल्हाध्यक्ष रेखा फड यांच्या मार्गदर्शनाखाली ८ ते ९ महिला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डिझेल - पेट्रोल दरवाढीविरोधात आंदोलन करीत होत्या. यावेळी फड यांनी मुख्य प्रवेशद्वारावरच चूल पेटवण्याचा प्रयत्न केला. बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाºयांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसास शिवीगाळ करुन, तू मला ओळखत नाहीस, तुझी नौकरी सांभाळ. मी तुझी नौकरी घालवून टाकीन. तू कोण मला अडवणारा ? मी माझे आंदोलन येथेच करीन, अशा भाषेत धमकी देऊन पोलिसांच्या अंगावर त्या धावल्या. प्रसंगावधान राखत महिला पोलिसांनी या सर्व आंदोलककर्त्या महिलांना अटक करुन शिवाजीनगर ठाण्यात हजर केले. पोलीस नाईक आशिष वडमारे यांच्या फिर्यादीवरुन रेखा फड यांच्यासह बेबी भिकाजी रणसिंग, नंदा वामन सारुक, सुनीता बन्सी नवले, लतिका अरुण काळे, सीमा जीवन बुगडे, तारामती चंद्रसेन लाड यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा तसेच इतर कलामान्वये शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.यापूर्वीही फड यांच्यावर गुन्हाकाही महिन्यांपूर्वी सिद्धीविनायक कॉम्प्लेक्समधील एका जाहीर सभेत रेखा फड यांनी केजच्या पोलीस निरीक्षकांवर वेगवेगळे आरोप केले होते. पोलिसांनी त्यानंतर तात्काळ रेखा फड यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. एक पूर्ण दिवस स्थानिक गुन्हे शाखेत बसविले होते. आंदोलन करताना त्यांनी पुन्हा पोलिसांना शिवीगाळ केली.

टॅग्स :BeedबीडPoliticsराजकारणPoliceपोलिसMarathwadaमराठवाडा