शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

Beed: पाण्यासाठी सख्ख्या भावांनी उपसल्या कुऱ्हाडी! दोन गटांत रक्तरंजित संघर्ष, ८ जणांवर गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 14:03 IST

येवत्यात दोन सख्खे भाऊ कुऱ्हाड-कत्तीनिशी भिडले; ८ जणांवर गुन्हा

- मधुकर सिरसटकेज (बीड): विहिरीच्या पाण्यावरून दोन सख्या भावांमध्ये जुंपलेल्या वादाचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात झाल्याची धक्कादायक घटना केज तालुक्यातील येवता येथे घडली आहे. सख्या भावांनी एकमेकांविरुद्ध कुऱ्हाड, कत्ती आणि काठ्यांचा वापर केल्याने दोन्ही गटातील लोक जखमी झाले आहेत. याप्रकरणी केज पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या एकूण ८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून परिसरात या घटनेची मोठी चर्चा आहे.

येवता येथील मल्हारी लक्ष्मण सक्राते (५३) यांच्या फिर्यादीनुसार, बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ते शेतात असताना त्यांचा सख्खा भाऊ अशोक सक्राते आणि त्याच्या मुलांनी तेथे येऊन वाद घातला. "विहीर आमची आहे, मोटार चालू करू नकोस," असे म्हणत त्यांनी शिवीगाळ केली. "आपण पाळीने (बारीने) पाणी घेऊ" असे मल्हारी यांनी सुचवले असता, रागाच्या भरात अशोकने कुऱ्हाडीने मल्हारी यांच्या डोक्यात वार करून त्यांना गंभीर जखमी केले. याप्रकरणी अशोक सक्राते, प्रणव, समाधान आणि शिवकन्या या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

दुसरीकडे, दुसऱ्या गटाचे प्रणव अशोक सक्राते यांनीही फिर्याद दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ते विहिरीवर मोटार चालू करण्यास गेले असता त्यांचे चुलते मल्हारी सक्राते, दीपक, प्रवीण आणि शारदा सक्राते यांनी त्यांना अडवले. यावेळी झालेल्या वादात चुलते मल्हारी सक्राते यांनी धारदार कत्तीने प्रणवच्या हातावर वार करून त्याला जखमी केले, तर इतरांनी दगडाने मारहाण केली. या तक्रारीवरून मल्हारी सक्राते यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नात्यापेक्षा 'पाणी' ठरले मोठे? एकदा विहिरीच्या पाण्यावरून हा वाद विकोपाला गेल्याने दोन सख्खी कुटुंबं आता पोलीस ठाण्याची पायरी चढली आहेत. पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल केले असून जमादार हनुमान मुंडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे ग्रामीण भागात पाण्यासाठी नाती कशी दुरावत चालली आहेत, याचे विदारक चित्र समोर आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Beed: Sibling rivalry over water turns violent; 8 booked.

Web Summary : A water dispute between brothers in Beed's Yevta escalated into violence, with axes and sticks used. Eight individuals from both families have been booked by Kej police. The incident highlights the strained relationships over water scarcity in rural areas.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याCrime Newsगुन्हेगारी