शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
3
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
4
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
5
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
6
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
7
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद
8
IAS Misha Singh : लय भारी! वडील शेतकरी, लेक IAS अधिकारी; LLB नंतर UPSC ची तयारी, केली दमदार कामगिरी
9
मराठा समाज अन् राज्य सरकारला मोठा दिलासा; 'त्या' GR ला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
10
काही महिने थांबा, पेट्रोल कारच्या किंमतीत EV कार मिळतील; नितीन गडकरींचा मोठा दावा...
11
Thane Crime: ठाण्यात व्हॉट्सअपद्वारे 'सेक्स रॅकेट'; थेट हॉटेलमध्ये पोहोचले पोलीस, दलाल महिलेस अटक
12
"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान
13
घनदाट जंगलात शूट झालाय 'कांतारा: चाप्टर १', कुठे आहेत हे नयनरम्य लोकेशन्स?
14
VIDEO: मोदींना विचारलं "आंबा कसा खाता?" झाला ट्रोल, आता अक्षयचा फडणवीसांना प्रश्न, "तुम्ही संत्री कशी खाता?"
15
IND vs AUS : फिटनेसच ठिकये पण फॉर्मच काय? रोहित-विराटच्या सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह
16
२ तप सत्तेत, २४ वर्षांत काय-काय झाले? नरेंद्र मोदींनी सांगितली CM ते PM प्रवासाची Inside Story...
17
कफ सिरप मृत्यू प्रकरण : मृत मुलाच्या कबरीतून डॉक्टरचे 'ते' प्रिस्क्रिप्शन काढले बाहेर; आणखी एका बालकाची प्रकृती चिंताजनक
18
शिंदेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटणार?; अंतिम निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार, असीम सरोदेंचा दावा
19
छोटे व्हिडीओ पाहण्याची सवय जीवघेणी; मेंदूचं मोठं नुकसान, दारुच्या व्यसनापेक्षाही ५ पट धोका
20
"रात्री ३ वाजता उठवलं तरी मी उर्दू बोलतो...", सचिन पिळगावकरांचं नवं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

Beed: अपघाताने क्रूर धंदा उघड! महागड्या कारमधून १५ वासरांची कत्तलीसाठी तस्करी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 13:06 IST

कत्तलीसाठी जात होती १५ नवजात वासरे; महागड्या कारचा अपघात होताच गोमाफीयांचा क्रूर धंदा उघड!

- नितीन कांबळेकडा (बीड): बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. अहिल्यानगर-बीड राष्ट्रीय महामार्गावरील शेरी बुद्रुक येथे मंगळवारी सकाळी झालेल्या एका भीषण अपघातामुळे नवजात वासरांच्या कत्तलीसाठी होणारी क्रूर तस्करी उघड झाली आहे. अपघातात सापडलेल्या महागड्या कारमध्ये १५ निष्पाप वासरे अत्यंत अमानुषपणे कोंबून नेली जात होती.

मंगळवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास (एम.एच २०,बी.क्यू.३२३२) क्रमांकाची एक महागडी कार अहिल्यानगरहून परळीच्या दिशेने जात असलेल्या दुसऱ्या एका चारचाकी वाहनाला पाठीमागून धडकली. धडक एवढी जोरदार होती की, वासरांची तस्करी करणारी कार थेट रस्त्यालगत असलेल्या शुभम रमेश रासकर यांच्या शेडमध्ये घुसली. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. अपघातग्रस्त कारची पाहणी केली असता आतमध्ये जे दृश्य दिसले, त्याने उपस्थितांचे हृदय हेलावले. कारमध्ये १५ नवजात वासरे निर्दयपणे कोंबलेली होती. त्यांच्या तोंडाला टेप लावली होती आणि पळून जाऊ नये म्हणून पाय बांधलेले होते.

नागरिकांची तत्परता आणि पोलिसांची धावअपघातग्रस्त वासरांना नागरिकांनी तात्काळ बाहेर काढण्यास सुरुवात केली. शिवक्रांती सेनेचे युवक प्रदेश अध्यक्ष दीपक सोनवणे, अशोक मुटकुळे, दादासाहेब सोनवणे, अजिनाथ सोनवणे यांच्यासह अनेक तरुणांनी वासरांच्या तोंडाची टेप आणि पाय बांधलेले दोर सोडले. यातील काही वासरांना गंभीर दुखापत झाली होती. घटनेची माहिती मिळताच कडा पोलीस चौकीचे पोलीस हवालदार भाऊसाहेब आहेर आणि अमोल नवले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून वासरांना ताब्यात घेतले आहे. गोमाफीयांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या वासरांना पुढील उपचारासाठी आणि सुरक्षिततेसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील गोशाळेत स्वाधीन करण्यात येणार आहे.

गोमाफीयांवर मकोका लावाया घटनेनंतर गोमाफीयांच्या वाढत्या क्रूर कृत्यांवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवक्रांती सेनेचे युवक प्रदेश अध्यक्ष दीपक सोनवणे यांनी या तस्करीला आळा घालण्यासाठी कडक मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, "तालुक्यात यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. बाहेरच्या जिल्ह्यातील गोमाफीया या रस्त्यावरून सुसाट जातात. अशा क्रूर गोमाफीयांवर आता 'मकोका' कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी."

English
हिंदी सारांश
Web Title : Beed Accident Exposes Cruel Calf Smuggling Operation in Luxury Car

Web Summary : A Beed accident revealed a calf smuggling operation. Fifteen calves were inhumanely transported in a luxury car for slaughter. Police intervened, rescuing the animals and initiating legal action against the perpetrators. Locals demand strict action.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याBeedबीड