शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

Beed: हॉटेल कामगार २० वर्षीय तरुणाने संपवले जीवन; सांगवी शिवारातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 13:10 IST

मृत्यूचं रहस्य मोबाईलमध्ये दडलंय? मयत तरुणाचे सीडीआर तपासण्याची ग्रामस्थांची मागणी

कडा (आष्टी): आष्टी तालुक्यातील सांगवी (पाटण) शिवारात एका २० वर्षीय तरुणाने नदीकाठच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी रात्री समोर आली आहे. भाऊसाहेब ऊर्फ बावड्या राम खंडागळे (वय २०) असे मयत तरुणाचे नाव असून, त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

काय आहे नेमकी घटना? भाऊसाहेब हा तरुण गेल्या अनेक वर्षांपासून गावाजवळच एका हॉटेलवर कामगार म्हणून काम करत होता. त्याचे वडील भोळसर असल्याने चुलते त्यांना ऊसतोडीला सोबत नेतात, तर आई कधी पुण्यात तर कधी गावी असते. भाऊसाहेब स्वतः चुलत्याच्या घरी राहून कुटुंबाला आधार देत होता. शुक्रवारी तो गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेला होता. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने चुलत भाऊ आणि नातेवाईकांनी शोध सुरू केला असता, घरापासून जवळच असलेल्या नदीकाठच्या झाडाला त्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.

मोबाईल सीडीआर तपासण्याची मागणी घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलीस ठाण्याचे हवालदार भाऊसाहेब आहेर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. भाऊसाहेबने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, तो वापरत असलेल्या मोबाईलचे सीडीआर तपासल्यास मृत्यूचे गूढ उकलू शकेल, अशी मागणी नातेवाईक आणि ग्रामस्थांकडून केली जात आहे. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला असून आष्टी पोलिसांत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Beed: 20-Year-Old Hotel Worker Ends Life in Sangvi

Web Summary : A 20-year-old hotel worker, Bhausaheb Khandagale, was found dead near Sangvi village. He hanged himself from a tree. The reason is unknown. Police are investigating, and relatives request mobile CDR analysis.
टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी