शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

बीडमध्ये ११३९ उमेदवारांनी दिली पोलीस भरतीची लेखी परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 00:43 IST

बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलीस भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षा शुक्रवारी सकाळी सुरूळीत पार पडली. ११६६ पैकी ११३९ उमेदवार परीक्षेस हजर होते तर २७ गैरहजर होते. २९ हॉलमध्ये ही तगड्या बंदोबस्तात ही परीक्षा पार पडली. एकुणच ही पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यात जिल्हा पोलीस दलाला यश आले आहे.

ठळक मुद्दे२९ हॉलमध्ये तगडा बंदोबस्त; हॉलमध्ये कॅमेऱ्यांसह अधिकारी, चार कर्मचारी

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्हा पोलीस दलाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलीस भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षा शुक्रवारी सकाळी सुरूळीत पार पडली. ११६६ पैकी ११३९ उमेदवार परीक्षेस हजर होते तर २७ गैरहजर होते. २९ हॉलमध्ये ही तगड्या बंदोबस्तात ही परीक्षा पार पडली. एकुणच ही पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यात जिल्हा पोलीस दलाला यश आले आहे.

मागील महिनाभरापासून जिल्हा पोलीस दल भरती प्रक्रियेत व्यस्त होते. ५३ जागांसाठी १२ ते २१ मार्च दरम्यान मैदानी चाचणी झाली. यात ४ हजार उमेदवार पात्र ठरले. पैकी ११६६ उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडण्यात आले. या उमेदवारांची शुक्रवारी बीडमध्ये आदित्य इंजिनिअरिंग महाविद्यालयात सकाळी ९ ते १०.३० या दरम्यान एकाच वेळी परीक्षा घेण्यात आली. ११६६ पैकी २७ उमेदवार गैरहजर होते. एकूण २९ हॉलमध्ये प्रत्येकी ४० उमेदवार बसविण्यात आले.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून गैरप्रकार टाळण्यासाठी प्रत्येक हॉलमध्ये एक अधिकारी, चार कर्मचारी तसेच एक कॅमेरामन नियुक्त केला होता. परिक्षेदरम्यान वॉकी-टॉकीवरुन पोलीस अधीक्षक जी. श्रीधर प्रत्येक अधिकाºयाला घ्यावयाच्या काळजीबाबत सूचना करीत होते. तगड्या बंदोबस्तात परीक्षा सुरळीत पार पडली. केंद्राच्या बाहेरही तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.तगडा बंदोबस्तपोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे, उप अधीक्षक भाग्यश्री नवटके, डॉ. अभिजित पाटील, सुधीर खिरडकर, विशाल आनंद, अर्जुन भोसले, मंदार नाईक, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे सह इतर अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तावर तैनात होते.

अर्धा तास अगोदरच उमेदवार हॉलमध्येऐनवेळी धावपळ, गडबड गोंधळ होऊ नये यासाठी सर्व उमेदवारांना सकाळी ७ वाजताच केंद्रस्थळी बोलाविले होते. शांततेत चौकशी व तपासणी करुन त्यांना हॉलमध्ये सोडण्यात आले. अर्धातास अगोदरच ते हॉलमध्ये बसले. धावपळीने त्रास झाल्यामुळे उमेदवार थोडा वेळ शांत बसले. बायोमॅट्रीकद्वारे त्याची हजेरी घेण्यात आली. सकाळी ९ वाजता उमेदवारांच्या हाती प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका देण्यात आली.

अडीच वाजता मिळाली अ‍ॅन्सर कीपरीक्षा संपल्यानंतर चार तासांनी दुपारी २.३० वाजता अ‍ॅन्सर की उमेदवारांना पाहवयास मिळाली. बीड पोलीस या संकेतस्थळासह पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस मुख्यालयावर या अ‍ॅन्सर की प्रसिद्ध करण्यात आल्या.

टॅग्स :BeedबीडPoliceपोलिसMarathwadaमराठवाडाexamपरीक्षा