शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

बीडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; चार घरफोड्या; माजी सैनिकाची चोरली रायफल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 01:08 IST

बीड शहरात रविवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. सावता माळी चौकात ३, तर सारडानगरीत १ घरफोडी झाली. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. हजारोंचा ऐवज लंपास केला आहे.

बीड : शहरात रविवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. सावता माळी चौकात ३, तर सारडानगरीत १ घरफोडी झाली. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. हजारोंचा ऐवज लंपास केला आहे.

सावता माळी चौकातील गणेश गाडे या रेणुकामाता बँकेच्या मॅनेजरचे घर चोरट्यांनी फोडले. गाडे हे किरायाने राहतात. त्यांच्या घरातून १९ हजार रुपये रोख, चार तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले. त्यानंतर शेजारीच असलेले सचिन बाहेती यांच्या घराचा कोंडा तोडून आत शिरले. बाहेती यांच्या घरातून रोख ६० हजार रुपयांसह इतर असा ८० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

दोन घरफोड्या झाल्यानंतर चोरट्यांनी माजी सैनिकाच्या घराकडे मोर्चा वळविला. चार महिन्यांपूर्वीच निवृत्त झालेले पंजाब श्रीधर चव्हाण (रा. घारगाव, ता. बीड) हे गावाकडे गेले होते. हीच संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घरातील १२ बोर असलेली रायफल लंपास केली. परवाना दुरुस्तीसाठी त्यांनी ती घरात ठेवल्याचे सांगितले. येथे सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे कैद झाले आहेत.

चौथी चोरी सारडानगरीत झाली. किरायाच्या घरात राहणारे अशोक सानप हे पत्नीसह गावी गेले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी दरवाजाचा कोंडा तोडून कपाटातील रोख २६ हजार रुपये, अंगठी व छोट्या बाळाचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. घटनेची माहिती मिळताच शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान हे फौजफाट्यासह दाखल झाले. त्यांनी पंचनामा करुन चोरट्यांचा मागोवा काढला. परंतु उशिरापर्यंत त्यांच्या हाती काहीच लागले नाही.चार चोरटे सीसीटीव्हीत कैदसावतामाळी चौकात झालेल्या चोरीमध्ये चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. पहाटे ३.५७ वाजता चोरटे इमारतीत शिरले. ४.२० ला ते बाहेर पडल्याचे कॅमेऱ्यात दिसत आहे. सर्वांनी तोंडावर टॉवेल घेतल्याने त्यांचे चेहरे ओळखण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागत आहे.

टॅग्स :BeedबीडCrimeगुन्हाThiefचोरMarathwadaमराठवाडा