शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
2
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
3
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
4
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
5
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
6
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
7
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
8
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
9
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
10
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
11
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
12
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
13
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
14
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
15
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
16
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
17
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
18
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
19
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
20
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

प्रसुतीत पुणेनंतर बीड ठरणार मॉडेल; जिल्हा रुग्णालयाकडून ‘वचनपूर्ती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 12:19 AM

बीड जिल्ह्यातील पाच केंद्रांवर एका महिन्यात तब्बल ७४९ महिलांची प्रसूती झाली आहे. यामध्ये १६० सिझरचा समावेश आहे. यामुळे पुणेनंतर बीड जिल्हा राज्यात ‘मॉडेल’ ठरणार आहे. विशेष म्हणजे आरोग्य आयुक्तांनी दिलेले १५० (एका महिन्यात) प्रसुतींचे चॅलेंज बीड जिल्हा रूग्णालयाने पूर्ण केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील पाच केंद्रांवर एका महिन्यात तब्बल ७४९ महिलांची प्रसूती झाली आहे. यामध्ये १६० सिझरचा समावेश आहे. यामुळे पुणेनंतर बीड जिल्हा राज्यात ‘मॉडेल’ ठरणार आहे. विशेष म्हणजे आरोग्य आयुक्तांनी दिलेले १५० (एका महिन्यात) प्रसुतींचे चॅलेंज बीड जिल्हा रूग्णालयाने पूर्ण केले आहे.

केवळ जिल्हा रूग्णालयात प्रसुतीची व्यवस्था होती. उपजिल्हा, ग्रामीण व प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा नाही, असे कारण सांगत महिलांना जिल्हा रूग्णालयाची वाट दाखविली जात असे. यामध्ये गर्भवती मातांना ‘कळा’ सहन कराव्या लागत होत्या. यामुळे आरोग्य यंत्रणेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत होती. हाच धागा पकडून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी जिल्ह्यात जिल्हा रूग्णालय वगळून गेवराई, केज, माजलगाव, परळी व नेकनूर येथे प्रसुतीची व्यवस्था केली. याठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांची नियूक्ती केली. या पाच केंद्रांमध्ये पूरेशा सुविधाही उपलब्ध करून दिल्या, त्यामुळे गर्भवती महिलांना प्रसुतीसाठी जिल्हा रूग्णालयात येण्याची गरज राहिली नाही. गतवर्षी डिसेंबर महिन्याच्या प्रारंभीच हे केंद्र सुरू केले होते. या सर्व केंद्रांमध्ये प्रसुतीसाठी येणाºयांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे समोर आले आहे.जिल्ह्यात केज अव्वलपाच केंद्रांमध्ये केजमध्ये सर्वाधिक १९२ प्रसूती झाल्या आहेत. यामध्ये ५५ सिझरचा समावेश आहे. त्यानंतर परळी १७२, माजलगाव १४८, गेवराई १५९ तर नेकनूर ७८ यांचा क्रमांक येतो. नेकनूर परिसरात कमी गावे असल्याने आणि जिल्हा रूग्णालय जवळ असल्याने येथील १५० चे उद्दिष्ट पूर्ण झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

आष्टी येथे नवीन केंद्र सुरु करणारआतापर्यंत पाच केंद्रांवर प्रसुतीची सुविधा आहे. सिझरचीही सुविधा आहे. आणखी आष्टी येथेही नवीन केंद्र सुरू करण्याचा विचार आहे. पुढील आठवड्यात यावर निर्णय होईल. डिसेंबर महिन्यात ७४९ महिलांची प्रसूती झाली असून, पैकी १६० सिझर आहेत. यापुढेही आमचे स्थान अव्वल राखून ठेवण्यासाठी माझ्यासह सर्व टिम परिश्रम घेईल.- डॉ.अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड

काय होते ‘चॅलेंज’आरोग्य आयुक्त डॉ.संजीव कुमार यांनी राज्यात केवळ पुणे येथील दोन केंद्रांवर २५ सिझर व १२५ नॉर्मल प्रसुती होत असून तेच राज्यात अव्वल असल्याचे सांगितले होते. इतर जिल्ह्यात असे करण्यास कोण उत्सूक आहे, असे त्यांनी थेट सर्व जिल्हा शल्यचिकित्सकांना विचारले होते. यामध्ये बीडचे सीएस डॉ.थोरात यांनी आपण हे करू शकतो. आयुक्तांनी दिलेले चॅलेंज त्यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून पूर्ण करून दाखविल्याने त्यांचे स्वागत होत आहे.