शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बीडकरांनो, चादर, फुगे, खेळणी विकणाऱ्यांपासून सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 23:56 IST

परराज्यातून गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही लोक बीड जिल्ह्यात आले आहेत. चादर, खेळणी, फुगे विकण्याच्या बहाण्याने घर हेरतात आणि रात्रीच्यावेळी चोरी करतात. तसेच घरात कोणी नसल्याची संधी पाहून दिवसाही चोरीचा प्रयत्न करीत असल्याचे समोर आले आहे. बीडमधील महिला पोलिसाच्या घरी चोरी करणा-या दोन आरोपींकडून याबाबत खुलासा झाला असून नागरिकांनी सावधान राहण्याचे आवाहन जिल्हा पोलीस दलाच्यावतीने करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमहिला पोलिसाच्या घरी चोरी करणा-यांकडून खुलासा

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : परराज्यातून गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही लोक बीड जिल्ह्यात आले आहेत. चादर, खेळणी, फुगे विकण्याच्या बहाण्याने घर हेरतात आणि रात्रीच्यावेळी चोरी करतात. तसेच घरात कोणी नसल्याची संधी पाहून दिवसाही चोरीचा प्रयत्न करीत असल्याचे समोर आले आहे. बीडमधील महिला पोलिसाच्या घरी चोरी करणा-या दोन आरोपींकडून याबाबत खुलासा झाला असून नागरिकांनी सावधान राहण्याचे आवाहन जिल्हा पोलीस दलाच्यावतीने करण्यात आले आहे.

बीड शहरातील बालेपीर भागातील पोलीस कॉलनीतील कुसूम घुले यांच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला होता. चादर विक्रीच्या बहाण्याने मोहम्मद सोनू व मोहम्मद जाबाज (रा.रसुलपुर जि.सारंगपुर, उत्तरप्रदेश) हे दोघे घरात शिरले होते. परंतु हा प्रकार घुले यांच्या वेळीच लक्षात आल्यानंतर त्यांनी आपला हिसका दाखविला. दोघे असल्याने त्यांनी आरडाओरडा केला आणि नागरिकांना जमा केले. त्यांच्या मदतीने या दोघांना शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांच्याविरोधात शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

दरम्यान, पोलिसांनी तपास केला असता या दोघांनी अनेकांच्या घरी छोट्या मोठ्या चोºया केल्याची कबुली दिली आहे. तसेच यांच्यासारखेच काही लोक बीडमध्ये आले असावेत, असा संशय बीड पोलिसांना आहे. असे कोणी लोक खरच आले आहेत का, याचा तपास पोलीस करीत आहेत. शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे, सपोनि दिलीप तेजनकर, पोउपनि भुषण सोनार यांनी या दोन्ही आरोपींची कसून चौकशी केली.

सर्व सारखे नाहीत, पण काळजी घ्या...परिस्थितीमुळे काही लोक खरोखरच मेहनत घेऊन पोटाची खळगी भरत आहेत. परंतु काही लोक चादर, फुगे, खेळणी विक्रीच्या बहाण्याने घरे हेरत आहेत. रात्रीच्यावेळी त्याच घरात चोरी करतात.अनेकवेळा दिवसाही चोरी करण्याचा प्रयत्न करतात. कोणी कसेही असो, परंतु नागरिकांनी सजग राहून काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बो-हाडे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर, गुन्हे शाखेचे पोनि घनश्याम पाळवदे यांनी केले आहे.

परळीतही घडली होती घटनादोन महिन्यांपूर्वी परळी शहरातही परराज्यातील आलेल्या काही लोकांनी दिवसभर फुगे विकून घरे हेरली होती. त्यानंतर रात्रीच्यावेळी त्यांनी घरफोड्या केल्या होत्या. या आरोपींच्या मुसक्या आवळल्यानंतर पोलीस तपासातून अनेक बाबी समोर आल्या होत्या.

टॅग्स :BeedबीडPoliceपोलिसMarathwadaमराठवाडाtheftचोरी