शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

बीडमध्ये भिकारी युवतीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 1:08 AM

बीड : परिस्थितीचा फायदा घेऊन एका अल्पवयीन भिकारी युवतीवर मोबाईल शॉपी चालविणा-या तरूणाने वारंवार अत्याचार केला. यातून ती सहा ...

ठळक मुद्देअल्पवयीन पीडिता सहा महिन्यांची गर्भवती

बीड : परिस्थितीचा फायदा घेऊन एका अल्पवयीन भिकारी युवतीवर मोबाईल शॉपी चालविणा-या तरूणाने वारंवार अत्याचार केला. यातून ती सहा महिन्यांची गर्भवती राहिली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

शेख जावेद शेख सलिम (कबाडगल्ली) असे त्या नराधमाचे नाव आहे. पीडिता ही केवळ १५ वर्षांची आहे. तिची आई बशिरगंज परिसरात भिक मागून पोट भरते. तिच्यासोबत तिची मुलगीही असे. मुलगी मोठी असल्याने तिच्यावर याच भागातील जावेदचा डोळा गेला. तिच्या परिस्थितीचा फायदा घेत त्याने मागील उन्हाळ्यापासून ते आजपर्यंत तिच्यावर वारंवार अत्याचार केला.

दरम्यान, या घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्यांनी पीडिता व तिच्या आईची चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. पीडितेला विश्वास देत पोलिसांनी तिच्याकडून संपूर्ण माहिती घेतली. यावेळी तिने आपल्यावर जावेदने वारंवार अत्याचार केल्याचे सांगितले. त्यानंतर जावेदवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जावेदला तात्काळ बशिरगंजमध्ये ताब्यात घेतल्याचे बीड शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान यांनी ‘लोकमत’ला सांगितले.लाखो रुपये खर्चून उभारलेली इमारत शोभेलाचबीड पालिकेच्यावतीने लाखो रूपये खर्च करून भाजी मंडईत अलिशान इमारत बांधण्यात आली. परंतु अद्यापही त्या इमारतीत कोणीच रहायला गेलेले नाही. पालिका मात्र आपण भिकाºयांचा सर्व्हे केला आहे. लवकरच त्यांना या इमारतीत वास्तव्यास पाठविण्यात येईल, असे अश्वासन देत आहे. विशेष म्हणजे मागील अनेक वर्षांपासून या इमारतीचे काम सुरू आहे. या ना त्या कारणावरून इमारत भिका-यांना देण्यास टाळाटाळ केली जात आहे. पालिकेतील राजकारण, आणि अधिका-यांचे दुर्लक्ष अशा घटनांना निमंत्रण देत आहेत. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. ही इमारत भिकाºयांना देण्याची मागणी आहे.