शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

बरेली से आये परळी! उत्तर प्रदेशचे १०० कावड यात्रेकरू वैद्यनाथ चरणी, मनोभावे घेतले दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 16:12 IST

बरेली येथील महाकाल कावड सेवासंघाच्या १०० सदस्यांनी नांदेड येथून परळीपर्यंत काढली कावड यात्रा

- संजय  खाकरेपरळी (बीड): हर हर महादेव, बोल बोल बम भोले, बोल कावडिया बम बोलचा नारा देत नांदेड ते परळी अशी १२० किमी पायी कावड यात्रा काढून उत्तर प्रदेश येथील बरेलीतून आलेल्या भाविकांनी श्री वैद्यनाथ प्रभूस जलाभिषेक केला. देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी कामिका एकादशी निमित्त आज ( दि. ३१ ) शिवभक्तांची सकाळपासून रीघ लागली. हजारो भक्तांनी श्री वैद्यनाथाचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच येथील श्री संत जगमित्र नागा मंदिरातही दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. वैद्यनाथ मंदिर परिसर एकादशीच्या दिवशी गजबजून गेल्याचे चित्र होते.

बुधवारी सकाळी ११ वाजता उत्तरप्रदेश राज्यातील बरेली येथील महाकाल कावड सेवासंघाच्या १०० सदस्यांनी नांदेड येथील गोदावरीचे जल पायी कावड यात्राद्वारे  श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाला वाहिले. तसेच भोग प्रसाद दाखवून वस्त्र अर्पण केले. नांदेड येथून कावड यात्रा २६ जुलै रोजी काढण्यात आली. ही कावड यात्रा ३० जुलै रोजी रात्री परळीत पोहचली, श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सेक्रेटरी प्रा. बाबासाहेब देशमुख,  विश्वस्त राजेश देशमुख येथील माजी नगरसेवक राजेंद्र सोनी ,रमेश चोंडे व इतरांनी या यात्रेचे स्वागत केले. त्यानंतर आज सकाळी कावड यात्रेतील १०० भाविकांनी हरहर महादेव, बोल बोल बम बम भोले, बोल कावडिया बम भोले, असा जयघोष करीत भक्तांनी दर्शन घेतले.

नांदेड ते परळी काढली कावड यात्राबरेली (उत्तर प्रदेश ) येथून आम्ही १०० भाविक आधी नांदेड येथे आलो. त्यानंतर नांदेड येथून कावडमध्ये गोदावरीचे पाणी घेत परळीपर्यंत कावड यात्रा काढली. आज सकाळी श्री वैद्यनाथास जलाभिषेक करून मनोभावे दर्शन घेतले. - विनोद गुप्ता, बरेली येथील भाविक

टॅग्स :BeedबीडUttar Pradeshउत्तर प्रदेश