शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

माजलगावमध्ये बदलापूरसारखी घटना; नामांकित शाळेच्या अंगणवाडीत चिमुकलीवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 19:04 IST

या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध पोस्को गुन्हा दाखल करण्यात आला आहे

माजलगाव ( बीड) : राज्यात शाळेत शिक्षण घेणाऱ्या शाळकरी मुलींवर अत्याचाराच्या घटनांची मालिका सुरूच असून बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील एका खासगी शाळेतील अंगणवाडीत साडेपाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका अज्ञाताविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. 

राज्यात बदलापूरच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून त्यानंतर दररोज कोठे ना कोठे शाळकरी मुलींवर अत्याचाराच्या, अन्यायाच्या घटना घडत असल्याच्या उघड होत आहेत. त्यामुळे पालक वर्गात अगोदरच भीतीचे वातावरण पसरलेले आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरालगत असलेल्या एका  शाळेत अंगणवाडी आहे. त्यामध्ये परिसरातील लहान मुले-मुली दररोज येतात. या परिसरातीलच एक साडेपाच वर्षाची चिमुरडी नियमित शाळेत येते. तिच्यावर शाळेतील एका अज्ञात इसमाने २७ सप्टेंबर रोजी मधल्या सुटीतील डबा खाल्यानंतर अत्याचार केला. घटनेनंतर चिमुरडी ताप येऊन आजारी पडली. त्यामुळे तिला दवाखान्यात उपचार करण्यात आले. घरी आल्यावर चिमुकलीने शाळेत पांढरे कपडे घातलेल्या व्यक्तीने घाणेरडे कृत्य केल्याचे पालकांना सांगितली. शाळेतील पांढरे कपडे घातलेला त्या माणसाला मी ओळखते असेही सांगितले. 

चिमूरडीच्या माहितीने हादरलेल्या पालकांनी गुरुवारी थेट माजलगाव शहर पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध लैंगिक अत्याचार पोस्को गून्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस यंत्रणा उपविभागीय अधिकारी धीरजकुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ व त्यांचे सहकारी करत आहेत. या घटनेने मात्र शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडsexual harassmentलैंगिक छळ