सुवर्णपदक घेऊन अविनाश साबळे गावात आला अन् ग्रामस्थांनी असे काही केले की...

By सोमनाथ खताळ | Published: October 7, 2023 10:08 PM2023-10-07T22:08:03+5:302023-10-07T22:09:09+5:30

देशाची मान उंचावणाऱ्या अविनाशला ग्रामस्थ डोक्यावर घेऊन नाचले.

avinash sable came to the village with the gold medal | सुवर्णपदक घेऊन अविनाश साबळे गावात आला अन् ग्रामस्थांनी असे काही केले की...

सुवर्णपदक घेऊन अविनाश साबळे गावात आला अन् ग्रामस्थांनी असे काही केले की...

googlenewsNext

सोमनाथ खताळ, आष्टी : तालुक्यातील मांडवा येथील रहिवासी असलेला ऑलिम्पिक खेळाडू अविनाश मुकुंद साबळे याने एक सुवर्ण व एक रौप्य पदक पटकावले. तो शनिवारी गावात आल्यावर त्याची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. देशाची मान उंचावणाऱ्या अविनाशला ग्रामस्थ डोक्यावर घेऊन नाचले.

चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ३ हजार मिटर स्टीपलचेस स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक व ५ हजार मीटर स्पर्धेमध्ये रौप्य पदक अविनाश साबळेने जिंकले. यामुळे भारत देशाचे नाव उंचावले. शनिवारी सायंकाळी तो आष्टी तालुक्यातील मांडवा येथे आपल्या गावी आला. यावेळी ग्रामस्थांनी त्याची वाजत गाजत, फुलांची उधळण करत गावभर मिरवणूक काढली. तसेच अनेकांनी त्याला डोक्यावर घेत घाेषणाबाजी केली. यावेळी अविनाश म्हणाला, ऑलिम्पिकचे एक काय अनेक पदके आपल्या देशाला मिळू शकतात. माझ्या खेळाचा सराव आणखी थांबवलेला नाही. २०२३ मध्ये मिळालेली पदके जबाबदारी वाढविणारे आहेत.

यावेळी सरपंच सुभाष माळी, उपसरपंच संतोष मुटकुळे, माजी सरपंच अशोक मुटकुळे, देवा धुमाळ, योगेश मुटकुळे, प्रा. सुनील मुटकुळे, तलाठी बाळासाहेब बनगे, प्रा. डॉ. बाबासाहेब मुटकुळे, विजय मुटकुळे, युवराज मुटकुळे, रावसाहेब मुटकुळे, अनिल मुटकुळे, भगवान श्रीखंडे, अश्वमेद मुटकुळे, योगेश कदम, धनेश मुटकुळे, ज्ञानदेव मुटकुळे, शरद पवार, योगेश मुटकुळे, सचिन मुटकुळे, शिक्षक सुनील तरटे, बाबासाहेब तावरे, दत्ता कदम, अशोक मुटकुळे, श्रीधर मुटकुळे, लक्ष्मण वीर, अमृत मुटकुळे, आप्पा शिंदे आदी उपस्थित होते.

Web Title: avinash sable came to the village with the gold medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :ashti-acआष्टी