शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

औरंगाबाद परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेचा बीडमध्ये उद्या समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 12:33 AM

औरंगाबाद परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन यावर्षी बीड शहरात करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : औरंगाबाद परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन यावर्षी बीड शहरात करण्यात आले होते. या स्पर्धेची सुरुवात २१ सप्टेंबरपासून करण्यात आली आहे. यावेळी औरंगाबाद शहर, औरंगाबाद ग्रामीण, जालना, बीड व उस्मानाबाद या विभागातील पोलीस कर्मचारी या स्पर्धांमध्ये सहभागी झाले आहेत. या स्पर्धेचा समारोप २५ सप्टेंबर रोजी बीड येथे होणार आहे. यावेळी परिक्षेत्रातील सर्व वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती असणार आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अंबाजोगाई पोलीस उपाधीक्षक राहुल धस, पोउपनि. विलास हजारे, यांची यावेळी उपस्थिती होती. पुढे बोलताना पोद्दार म्हणाले या पाच ठिकाणच्या क्रीडा स्पर्धा बीडमध्ये होत आहेत. ही आमच्यासाठी स्वागतार्ह बाब आहे, या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंची योग्य पद्धतिने सोय करण्यात आलेली आहे. यावेळी येथील पोलीस मुख्यालय क्रीडांगण, सैनिकी मैदान, व क्रीडा संकुल याठिकाणी विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. या स्पर्धांमध्ये ५ ठिकाणावरून ४७२ खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेमध्ये फुटबॉल, हॉलीबॉल, हॉकी, कबडी, खो-खो, बास्केटबॉल सात सांघीक खेळांचे प्रकार आहेत. तसेच अ‍ॅथलॅटिक्स प्रकारात गोळा फेक, भालाफेक, थाळीफेक, लांब उडी, तिहेरी उडी, उंज उडी, धावणे १०० मी, २०० मी, ४०० मी, ८०० मी, १५०० मी, ५ हजार मीटर, व १० हजार तसेच क्रॉस कंन्ट्री, कुस्ती, ज्यूदो, तायकवांदो, वेट लिफ्ंिटग, बॉक्ंिसग, स्विमिंग या क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा गुणांकन पद्धतने खेळवल्या जातात, तसेच या स्पर्धांमधून उत्कृष्ट संघाची निवड राज्य पोलीस खेळांसाठी निवडली जाते. या स्पर्धा उत्साहात सुरु असून यासाठी ७० पंचांची नेमणूक केली आहे.या स्पर्धेचा समारोप २५ सप्टेंबर रोजी होणार आहे. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंघल, पोलीस आयुक्त, तसेच बीड, उस्मानाबाद, जालना औरंगाबाद ग्रामीमचे पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी विजेत्या संघांना व स्पर्धकांना ट्रॉफी, मेडल, व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बीड पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या टीम तयार करण्यात आलेल्या आहेत. ते परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :Beed policeबीड पोलीसFootballफुटबॉलHockeyहॉकी