शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीसांकडून बहुजनांचे नेतृत्व पंकजा मुंडेंना संपवण्याचे प्रयत्न: सुषमा अंधारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 19:46 IST

पंतप्रधान मोदींच्या पोस्टरला काळे फासणाऱ्या सत्यजित तांबे यांचे फडणवीस समर्थन करत आहेत

माजलगाव ( बीड) : राज्यात सत्तेच्या जोरावर दडपशाही सुरू आहे. आता भाजपमध्ये स्वतःच्या पक्षातील लोकांना संपवण्याचे काम उपमुख्यमंत्री फडणवीस करत आहेत. बहुजनांचे नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या पंकजा मुंडे यांना संपवण्याचे प्रयत्न फडणवीस करत आहेत. यासोबतचा सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील या बहुजन नेत्यांना देखील फडणवीस संपवत आहेत, असा सनसनाटी आरोप ठाकरे गटाच्या शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. 

पत्रकार संघाच्या मुकनायक कार्यक्रमासाठी मंगळवारी माजलगाव येथे आल्या असता उपनेत्या अंधारे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या पुढे म्हणाल्या की, भाजपामध्ये दोन टिम आहेत, एक देंवद्र दुसरी टीम नरेंद्र. त्यामुळेच पंतप्रधान मोदींच्या पोस्टरला काळे फासणाऱ्या सत्यजित तांबे यांचे फडणवीस समर्थन करतात याहून दुसरे दुर्दैव काय आहे. राज्यात उर्फी जावेद पेक्षाही महत्वाचे प्रश्न भेडसावत असतांना भाजपातील महिलांकडे कोणताही मुद्दा नसल्याने फक्त जावेद आडनाव असल्यामुळे उर्फी जावेदला टार्गेट केलं जात असल्याचा आरोपही अंधारे यांनी केला. 

तसेच येणाऱ्या प्रत्येक निवडणूका कोणी सोबत येवो न येवो शिवसेना स्वतःच्या ताकतीवरच लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांच्यासमवेत सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब आंबूरे, जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव, अनिल जगताप, तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे, व्यंकटेश शिंदे, प्रभाकर धरपडे, संदीप माने, नागेश शिनगारे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

टॅग्स :BJPभाजपाBeedबीडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSushma Andhareसुषमा अंधारेPankaja Mundeपंकजा मुंडे