शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मुलाला वाचण्याच्या प्रयत्नात आई आणि बहिणीचाही धरणात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 15:32 IST

पोहता येत नसल्याने तिघांचाही बुडून मृत्यू झाला

माजलगाव (बीड ) : माजलगाव धरणातील पाण्यात कपडे धुताना मुलगा बुडत असल्याचे पाहून बहिण आणि आईने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोहता येत नसल्याने तिघांचाही बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ११ वाजता घडली. 

माजलगाव धरणात शहर व अकरा खेड्यांना पाणीपुरवठा करणारी एक पाण्याची टाकी आहे. या टाकीच्या जवळ कपडे धुण्यासाठी एक महिला व तीन-चार मुळे आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास आली. यावेळी शेख सोहेल शेख नजीम ( ११) हा पाण्यात खेळत असताना खोल पाण्याकडे गेल्याने बुडू लागला. तो बुडत असल्याचे पाहून त्याची मावस बहीण शेख तबु शेख गफार (१४ ) हिने पाण्यात उडी घेतली.

भावाला वाचवण्याऐवजी तीच पाण्यात बुडत असल्याचे पाहून त्यांना वाचविण्यासाठी सोहेलच्या आई शेख नसू शेख नामु (३० ) यांनी पाण्यात उडी घेतली. मात्र, तळ्यातील पाणी खोल असल्याने व तिला पोहता येत नसल्याने तीदेखील पाण्यात गटांगळ्या खाऊ लागली. आजूबाजूला असलेल्या बालकांनी आरडाओरडा केल्यानंतर घटनास्थळी अनेकजण जमले. यानंतर या तिघांना बाहेर काढण्यात आले परंतु ते तिघे मृत झाले होते.

शेख नसू ही माजगाव शेजारी असलेल्या भाटवडगाव येथील शेख मोहम्मद यांची कन्या आहे. ती दोन दिवसांपूर्वीच औरंगाबाद येथून माहेरी आईवडिलांना भेटण्यासाठी आली होती

टॅग्स :Deathमृत्यूMajalgaon Damमाजलगाव धरणBeedबीड