शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये ठाण्यात येऊन पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 16:57 IST

चक्क ठाण्यात येऊन मारहाण झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

बीड : ‘तु माझ्या मुलाला ठाण्यात का आणले’ या कारणावरून एकाने चार्ली पथकाच्या पोलीस कर्मचाऱ्यास ठाण्यात येत शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री १२ वाजता घडली. मारहाण करणारा आरोपी हा राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे बोलले जात आहे. चक्क ठाण्यात येऊन मारहाण झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

सुधीर शिंदे (४२ रा.केसापूरी परभणी ता.बीड) असे मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. २१ जानेवारी रोजी सचिन पवार या पोलीस कर्मचाऱ्याने सुधिरच्या मुलाला पकडले होते. त्याच्याविरोधात मुलींची छेड काढल्याची तक्रार होती. मित्र नगर भागात त्याला पकडल्यानंतर अवघ्या नववीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलाने पवार यांना अरेरावी केली. त्यामुळे त्याला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणले. येथे त्याचे वय कमी असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याऐवजी नातेवाईकांना बोलावून घेत समज देण्यात आली. ही माहिती सुधीर शिंदे यालाही दिली होती. त्याने आपण बीडला आल्यावर हे प्रकरण पाहून घेऊ, असे पोलिसांना सांगितले होते.

दरम्यान, मंगळवारी शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत सचिन पवार आणि खंडागळे हे दोघे गस्त घालत होते. रात्री ८ वाजेच्या सुमारास पवार यांना सधीर शिंदेचा फोन आला. त्याने पवार यांना शिवीगाळ केली. त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र माझा मुलगा छेड काढेल अन्यथा काही पण करेल, तुला काय करायचे, असे म्हणत अरेरावी केली. पवार यांनी त्याला ठाण्यात बोलावले. रात्री १२ वाजता पवार ठाण्यात येताच, तुच का पवार, असे म्हणत त्यांची कॉलर पकडली आणि मारहाण करण्यास सुरूवात केली. इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून सोडवासोडव केली. हा प्रकार पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे यांच्या कानावर टाकला. त्यानंतर त्याला शहर पोलीस ठाण्यात हजर करून शासकीय कामात अडथळा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला. सध्या तो शहर पोलिसांच्या ताब्यात आहे.

मद्यपान करून मारहाणशिंदे हा ठाण्यात आला तेव्हा दारू पिलेला होता. पोनि पुरभे यांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली असता त्याने दारू पिल्याचा अहवाल तज्ज्ञांनीही दिला. दारू पिऊन ठाण्यात धिंगाणा घातल्याच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पालकांनी जागरूक व्हावेएखाद्या मुलीची छेड काढणे किंवा कोणाला विनाकारण त्रास देणे हे कायद्याने गुन्हा आहे. मुलीची तक्रार आल्यावर संबंधित मुलावर कारवाई करण्यासाठी पोलीस जातात. नंतर मोठा गुन्हा करू नये, यासाठी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करतात. मात्र काही पालक याचा नकारात्मक विचार करून अशा गोष्टींना आवर घालण्याऐवजी त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळेच दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालल्याचे दिसते. त्यामुळे पालकांनी जागरूक रहावे.

आरोपीने मद्यपान केले होते ठाण्यात येऊन पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केली. बीड शहर पोलीस ठाण्यात संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने रितसर फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सध्या ताब्यात आहे. त्याची वैद्यकीय तपासणी केली असून त्याने मद्यपान केल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला आहे.- शिवलाल पुरभे, पोलीस निरीक्षक, शिवाजीनगर पोलीस ठाणे, बीड 

टॅग्स :Beed policeबीड पोलीसArrestअटकCrime Newsगुन्हेगारी