लोकमत न्यूज नेटवर्ककेज : नदीला खेकडे पकडायला जावु, असे म्हणत चार वर्षाच्या मुलीस शेतात नेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना तालुक्यातील दहीफळ वडमाऊली येथे बुधवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. या प्रकरणी मुलीच्या पालकांनी आरोपीस पकडून केज पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. आरोपीस गुरुवारी न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथील कुटुंब कारखान्यास जाणार असल्याने सामानाची बांधाबांध करीत होते. बुधवारी ते गावात बैलगाडी व काही सामान घेऊन गेले होते. ते परत शेतातील घरी आले. त्यावेळी त्यांच्या सोबत आण्णा प्रभाकर गदळे हा पोते शिवू लागतो म्हणून सोबत आला होता.दोघांनी जेवन केल्यानंतर ते कामात व्यस्त असताना अण्णा गदळे याने चार वर्षीय मुलीस व तिच्या लहान भावाला सोबत घेऊन खेकडे धरण्याच्या बहाण्याने नांगराचे तास नावाने ओळखल्या जात असलेल्या शेतात घेऊन गेला. कोणी नसल्याची संधी साधून तिच्यावर त्याने अत्याचार केला.आपली मुले घरात नसल्याचे लक्षात येताच आई-वडिलांनी मुलांचा शोध घेतला. गदळे हा मुलांना शेतात घेऊन गेल्याच्या माहितीवरून शोध घेतला असता तो नराधम पळसाच्या आळ्यात लपून बसला होता. त्याला नातेवाईकांनी पकडले. त्यानंतर पीडित मुलीने आईला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर गदळेला केज पोलिसांच्या स्वाधीन केले. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोउपनि सुभाष कदम हे करीत आहेत.
दहीफळ वडमाऊलीत चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 00:19 IST