बीड: मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या बीड जिल्ह्यातील २७ व्यक्तींच्या वारसांना राज्य सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येक कुटुंबाला १० लाख रुपये याप्रमाणे एकूण २ कोटी ७० लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सचिवालयाकडून ५ सप्टेंबर रोजी बीड जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
मंजूर झालेली ही रक्कम स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बीड येथील राजुरी वेस शाखेत असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. या संदर्भाने जिल्हा प्रशासनाला तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या मदतीमुळे मराठा आंदोलनातील पीडित कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या सूचना
जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व माहितीची पडताळणी करून ही मदत कायदेशीर वारसांना त्वरित वितरित करावी.