पूरग्रस्तांना रंकाळा ग्रुपच्यावतीने मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:33 AM2021-07-31T04:33:38+5:302021-07-31T04:33:38+5:30

३० हजारांची बिस्किटे पाठविली : सढळ हाताने मदतीचे आवाहन बीड : कोकण-कोल्हापूर भागात अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्यांच्या मदतीसाठी रंकाळा ...

Assistance to flood victims on behalf of Rankala Group | पूरग्रस्तांना रंकाळा ग्रुपच्यावतीने मदत

पूरग्रस्तांना रंकाळा ग्रुपच्यावतीने मदत

Next

३० हजारांची बिस्किटे पाठविली : सढळ हाताने मदतीचे आवाहन

बीड : कोकण-कोल्हापूर भागात अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्यांच्या मदतीसाठी रंकाळा ग्रुपच्यावतीने ३० हजार रुपयांची बिस्किटे स्वनिधीतून पाठविण्यात आलेली आहेत. ज्यांना शक्य आहे त्यांनी ‘तुम्ही-आम्ही बीडकर’कडे मदत पोहोच करावी, असे आवाहन रंकाळा ग्रुपच्यावतीने करण्यात आले आहे. कोकण, कोल्हापूर भागात पावसाने हाहाकार केला असून लोकांच्या घरात पाणी शिरलेले आहे. परिणामी तेथील जनजीवन विस्कळीत झाले असून त्यांना मदतीची आज गरज आहे. हीच गरज ओळखून माणुसकीच्या नात्याने येथील रंकाळा ग्रुपने स्वनिधीतून बिस्किटे खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि संबंधित मदत ‘तुम्ही आम्ही बीडकर’ यांच्यावतीने जी मदत जमा करण्यात येत आहे, त्यात ही मदत तुम्ही आम्ही बीडकर, वाहनाने पूरग्रस्तांना पोहोच करणार आहेत. ग्रुपच्यावतीने शक्यती मदत करण्यात आलेली आहे. २०१९ मध्ये सांगलीमध्ये महापूर आला होता, त्यावेळी देखील रंकाळा ग्रुपने पुढाकार घेत दोन ट्रक साहित्य सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पोहोच केले होते. रंकाळा ग्रुप कायम अडचणीत असलेल्या लोकांना मदत करत आहे. गुरुवारी पूरग्रस्तांसाठी मदत पाठविण्यात आली. यावेळी कारागृह अधीक्षक विलास भोईटे, जिल्हा परिषद सदस्य ॲड.प्रकाश कवठेकर, सभापती बळीराम गवते, विजय लाटे, रतन बहिर, शिवाजी शिंदे, लक्ष्मण बारगजे, प्रशांत उगले, दत्ता काकडे, संदीप लवांडे आदी उपस्थित होते.

कोकण, कोल्हापूर भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून त्याचे व्हिडीओ पाहून तेथील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येते. त्याठिकाणी मदतीची आवश्यकता आहे. यामुळे शक्य ती मदत करण्यात आली आहे. सर्वांनीच माणुसकी म्हणून मदत करावी

-ॲड. प्रकाश कवठेकर, मार्गदर्शक, रंकाळा ग्रुप.

290721\430729_2_bed_17_29072021_14.jpg

रंकाळा ग्रुपच्या वतीने पुरग्रस्तांना मदत पाठवण्यात आली. 

Web Title: Assistance to flood victims on behalf of Rankala Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.