शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

आष्टीच्या उसतोड मजुराच्या मुलाचा मंगळवेढा कारखान्यावर काम करताना मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 17:05 IST

गव्हाणीत पडल्याने 18 वर्षीय युवकांचा मृत्यू

ठळक मुद्दे घरची हलाखीची परिस्थिती असल्याने महावीर येथे कामगार म्हणून ऊस टाकण्याच्या गव्हाणीत काम करू लागला.

कडा ( बीड ) : कचरा काढत असताना पाय घसरुन गव्हाणीत पडल्याने चैनमध्ये अडकून एका १८ वर्षीय मुलाचा मंगळवेढा येथील साखर कारखान्यात मृत्यू झाला. महावीर माणिक गर्जे (वय.18 रा.हातोला ता.आष्टी,जि.बीड ) असे मृताचे नाव असून त्याचे पालक उसतोड मजूर असून याच कारखान्यावर काम करतात.

आष्टी तालुक्यातील हातोला येथील माणिक गर्जॅ हे मंगळवेढा येथील श्री संत  दामाजी सहकारी साखर कारखाना येथे उसतोड मजूर म्हणून काम करतात. कारखान्यावरती बैलगाडीने ऊस वाहतूक  करतात. घरात अठरा विश्व दारिद्र्य असल्यामुळे मुलांना देखील वडिलांना हातभार लावावा लागत होता. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे महाविद्यालय बंद आहेत. गर्जे यांचा १२ वित असणारा मुलगा महावीर पालकांना मदत म्हणून त्यांच्यासोबत कारखान्यावर आला. घरची हलाखीची परिस्थिती असल्याने महावीर येथे कामगार म्हणून ऊस टाकण्याच्या गव्हाणीत काम करू लागला. कारखान्यावरती रात्रपाळीला उसाच्या कांड्या गोळ्या करण्याच्या कामावर जात असे. मंगळवारी सकाळी कचरा काढत असताना पाय घसरुन महावीर गव्हाणीत पडला. त्याने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला मात्र चैनमध्ये अडकल्याने त्याचा मृत्यू झाला.

टॅग्स :Deathमृत्यूSugar factoryसाखर कारखानेBeedबीड