शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
7
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
8
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
9
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
10
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
11
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
12
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
13
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
14
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
15
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
16
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
17
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
18
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
19
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
20
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...

हातात तिरंगा घेऊन आष्टीच्या तरुणाचे बीडमध्ये शोलेस्टाईल आंदोलन

By संजय तिपाले | Published: February 06, 2023 3:01 PM

गावातील प्रश्नांसाठी तरुण टॉवरवर, साडेचार तासांपासून आंदोलन सुरू

बीड: गावात रस्त्याचे काम आठ वर्षांपासून रखडले आहे, आरोग्य सुविधा नाहीत, त्यामुळे आष्टी तालुक्यातील वाहिरा गावच्या एका तरुणाने शहरातील बालेपीर भागातील चाऊस गल्लीत मोबाइल टॉवरवर चढून ६ फेब्रुवारी रोजी शोलेस्टाईल आंदोलन सुरू केले आहे. साडेचार तासांपासून आंदोलनकर्त्या तरुणाची यंत्रणेकडून विनवणी सुरू आहे.

अशोक शिवाजी माने (३४,रा. वाहिरा ता. आष्टी) असे आंदोलनकर्त्या तरुणाचे नाव आहे. वाहिरा ते झांजे वस्ती, तरटे वस्ती ते धानोरा या रस्त्यांचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. दोन विद्यार्थी अपघातात जखमी झाले.आरोग्य केंद्रात डॉक्टर नसतात. आरोग्य सुविधांचा अभाव आहे, असा अशोक माने यांचा आरोप केला आहे. गावातील मूलभूत १० प्रश्नांची सोडवणूक करावी, यासाठी ३० जानेवारी २०२३ रोजी अशोक माने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले होते. मागण्यांची पूर्तता न झाल्यास ६ फेब्रुवारी रोजी शोलेस्टाईल आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मागण्या मान्य न केल्याने ६ रोजी अशोक माने हे बीडमधील नगर रोडवरील बालेपीर येथील चाऊस गल्लीतील मोबाइल टॉवरवर चढले. दरम्यान, सकाळी ११ वाजेपासून हे आंदोलन सुरू आहे. दुपारी सव्वादोन वाजता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गित्ते यांनी आंदोलनस्थळी येऊन आरोग्य केंद्रात डॉक्टर देण्याचे लेखी आश्वासन दिले, पण ते त्यांनी अमान्य केले असून रस्ता प्रश्न सोडविण्यासाठी उपाय करण्याची मागणी केली. ते मागण्यांवर ठाम असल्याने प्रशासन हतबल झाल्याचे दिसून आले.

यंत्रणेची धावपळअशोक माने यांनी शोलेस्टाईल आंदोलन सुरू केल्यानंतर शिवाजीनगर ठाण्याच्या विशेष शाखेचे अंमलदार संतोष रणदिवे, अभिजित सानप, शेख शहेंशाह तेथे पोहोचले. माने यांना खाली उतरण्याची विनंती केली, पण त्यांनी ती अमान्य केली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी, अग्निशामक दलाचा बंब, रुग्णवाहिका पाचारण करण्यात आली होती. तथापि, भरवसाहतीत हे आंदोलन सुरू असताना एकाहीवरिष्ठ पोलिस अधिकारी पोहोचले नव्हते.

हातात तिरंगा अन देशभक्तीपर गीतांसह आंदोलनमंत्रालयापर्यंत पाठपुरावा करुनही प्रश्न मार्गी न लागल्याने अशोक माने यांनी हे आंदोलन करून लक्ष वेधले आहे. देशभक्तीपर गीते लावून त्यांनी टॉवरवर हातात तिरंगा घेऊन आंदोलन सुरू केले आहे. त्यांना पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे.

टॅग्स :BeedबीडBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीड