शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

आष्टी तालुक्यात एकाच रात्री १४ दुकाने फोडली; मंदिरातही चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 23:56 IST

आष्टी / कडा : तालुक्यातील आष्टी, कडा, धानोरा येथे रविवारी एकाच रात्री १४ दुकाने फोडून चोरट्यांनी धुमाकुळ घातला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.९ सप्टेंबर रोजी मध्यरात्री चोरट्यांनी कडा बाजारपेठेतील पूनम कलेक्शन (रू. १४०००), दत्त कलेक्शन व गिफ्ट आर्टिकल्स (रु.३४०००), शिवम मेडिकल (रु.३०००), रंजन क्लॉथ स्टोअर्स (रू.१७०००), क्लासिक फूटवेअर (रु.१०७००) ...

आष्टी / कडा : तालुक्यातील आष्टी, कडा, धानोरा येथे रविवारी एकाच रात्री १४ दुकाने फोडून चोरट्यांनी धुमाकुळ घातला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

९ सप्टेंबर रोजी मध्यरात्री चोरट्यांनी कडा बाजारपेठेतील पूनम कलेक्शन (रू. १४०००), दत्त कलेक्शन व गिफ्ट आर्टिकल्स (रु.३४०००), शिवम मेडिकल (रु.३०००), रंजन क्लॉथ स्टोअर्स (रू.१७०००), क्लासिक फूटवेअर (रु.१०७००) या दुकानातुन साहित्य व रोख रक्कम चोरून नेली. स्टार कलेक्शन, सूर्या वाईन शॉप, जगदंबा इलेक्ट्रिक, आर्या सलून या दुकानांचे शटर तोडून नुकसान केले.

धानोरा येथील नगर- बीड मार्गावरील अनघा मेडिकल स्टोर मधून एक हजार रुपयांची सौन्दर्य प्रसाधने चोरट्यांनी चोरली. आष्टी येथील गणपती मंदिरासमोरील तोडकर कन्स्ट्रक्शन कार्यालयातील संगणक व इतर साहित्य असा रु.६८ हजार ५००, रामदेव फर्निचर अँड हार्डवेअरमधून रोख १२००० रुपये व इतर साहित्य, साई मेडिकल फोडून १२ हजार व माऊली आॅप्टिकल या दुकानातून ३ हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लांबविला. चोरांनी लोखंडी गजाच्या सहाय्याने सर्व शटर उचकटून रक्कम व साहित्य चोरुन नेले.

कडा, आष्टी व धानोरा येथे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे, उप विभागीय पोलीस अधिकारी मंदार नाईक, पोनि सय्यद शौकतअली, सपोनि भुतेकर, बारवकर यांनी भेट दिली. तसेच गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :BeedबीडThiefचोरMarathwadaमराठवाडाPoliceपोलिस