शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

आष्टी तालुक्यास अवकाळी पावसाचा तडाखा; घरावर वीज कोसळली, फळबागांचे मोठे नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 11:57 IST

कांदा, गहू, संत्रा, लिंबू, डाळींब, आंबा बागेतील काढणीस आलेल्या फळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

- अविनाश कदम आष्टी ( बीड) : शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव नाहीत. त्यात सोमवारी आणि मंगळवारी तालुक्यात अचानक पाऊस आल्याने शेतकऱ्यांच्यासमोर दुहेरी संकट आले आहे. अवकाळी पावसाने तालुक्यातील फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच एका घरावर वीज कोसळल्याची घटना पुढे आली आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

कांदा, गहू, संत्रा, लिंबू, डाळींब, आंबा बागेतील काढणीस आलेल्या फळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.  धामणगाव, मातकुळी, बाळेवाडीसह सात ते आठ गावात वादळ वाऱ्यासह पावसाने सर्वाधिक नुकसान झाले आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी बांधवाकडून होत आहे.

तालुक्यातील कारखेल बु.येथे आप्पसाहेब तुकाराम साळुंके यांच्या राहत्या घरावर मंगळवारी सकाळी 12  वाजेच्या सुमारास वीज पडली. त्यावेळी सर्व कुटुंब घरामध्ये होते. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पत्नी वच्‍छलाबाई आप्पासाहेब साळुंखे यांना डोक्याला किरकोळ मार लागला. या परिसरात पहिल्यांदाच राहत्या घरावर वीज पडल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

आष्टी तालुक्यातील बाळेवाडीसह काही गावांमधील झालेल्या शेतातील नुकसान झाले त्या भागांची आष्टी तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी पाहणी केली. सोमवारी व मंगळवारी वादळ वाऱ्यासह पाऊस पडल्याने साठ ते आठ गावांतील फळबागासह काही पिकांचे नुकसान झाल्याची माहिती कृषी अधिकारी तरटे यांनी दिली. नुकसानीबाबत महसूल आणि कृषीच्या संयुक्त पथकाच्या पाहणीत अधिक समजेल. शेतकऱ्यांनी हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवस वादळ वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी.

कृषी विभागाचे आवाहनज्या विमा धारक शेतकऱ्यांचे सोमवारी रात्री व मंगळवारी सकाळी झालेल्या पावसामुळे नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांनी Crop insurance या ॲप्लिकेशनव्दारे विमा कंपनीला 72 तासांच्या आत तक्रार द्यायची आहे. त्यात नुकसानीचे कारण unseasonable Rain हा पर्याय निवडायचा आहे असे आवाहन तालुका कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :BeedबीडRainपाऊस