शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

आष्टी तहसिलदारांची गाडी जळून भस्मसात; पहाटे तीन वाजेची घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2023 08:38 IST

पोलिस निरीक्षक, नगराध्यक्ष यांची घटनास्थळी भेट 

नितीन कांबळे, कडा -आष्टीचे तहसीलदार यांच्या गाडीला सोमवारी पहाटे अडीच,तीन वाजेच्या दरम्यान  अचानक आग लागली. आगीत शासकीय वाहन पुर्णपणे जळाले आहे. हि आग अचानक लागली की,कोणी  लावली याचा तपास लावण्याचे आव्हान आष्टी पोलिसांसमोर आहे. तहसीलदार याची गाडी अचानक जळाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

आष्टी येथील तहसीलदार प्रमोद गायकवाड हे रविवारी राञी नेहमी प्रमाणे  जुन्या तहसिलदार निवास समोर शासकीय वाहन क्रमांक एम.एच २३,एफ.१००३ लावले होते.पहाटे अडीच,तीनच्या दरम्यान अचानक या गाडीने पेट घेतला.घटनेची माहिती होताच तहसिलदार प्रमोद गायकवाड यांनी तात्काळ पोलिस निरीक्षक खेतमाळस यांना संपर्क साधत घटनास्थळी धाव घेतली.याठिकाणी नगराध्यक्ष जिया बेग यांनी नगर पंचायतच्या अग्नीशामक गाडीला बोलवत आग विजविण्यासाठी प्रयत्न केले व आग आटोक्यात आणली माञ तहसिलदार यांची गाडी पूर्ण भस्मसात झाली आहे.

आष्टी येथील तहसिलदार प्रमोद गायकवाड यांच्या गाडीला आग लावली की,आग लागली याचा तपास आष्टी पोलिस  करीत आहेत.घटनेची माहिती कळताच घटनास्थळी तहसीलदार गायकवाड पोलीस निरीक्षक खेतमाळस,नगराध्यक्ष जिया बेग यांची तातडीने धाव,अग्निशमन दलाच्या माध्यमातून आग आटोक्यात आणली नगराध्यक्ष जिया बेग यांनी पुढाकार घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आग आटोक्यात आणली.

टॅग्स :Accidentअपघातfireआग