शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

उसतोड कामगाराचा मुलगा बनला आष्टीचा तिसरा आमदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 00:32 IST

ऊस तोडणी कामगाराच्या मुलाने माळशिरसमधून निवडणूक लढवली. त्याचा फॉर्म भरायला स्वत: रणजितसिंह मोहिते पाटील हजर होते. आज तोच उसतोडणी कामगाराचा मुलगा विजयी झाला. तोही आष्टी तालुक्यातील राम सातपुते असे त्याचे नाव.

अविनाश कदम ।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : अकलूज माळशिरस म्हणजे मोहिते पाटलांचा गड. गेली अनेक वर्षे त्यांनी या भागात सहकार फुलवला. दुष्काळी भागात ऊस लागला. मोहितेंच्या उस कारखान्यांमुळे सुबत्ता आली. तिकडचा शेतकरी सुखी झाला. याच मोहिते पाटलांच्या कारखान्यात ऊस तोडणी कामगाराच्या मुलाने माळशिरसमधून निवडणूक लढवली. त्याचा फॉर्म भरायला स्वत: रणजितसिंह मोहिते पाटील हजर होते. आज तोच उसतोडणी कामगाराचा मुलगा विजयी झाला. तोही आष्टी तालुक्यातील राम सातपुते असे त्याचे नाव.आष्टी तालुकामध्ये डोईठाण नावाचे गाव आहे. विठ्ठल सातपुते याच गावाचे. परंपरागत चर्मकार व्यवसाय घरात चालत आलेला. पण दुष्काळामुळे पतीपत्नीला उसतोडणी कामगार म्हणून जाव लागायचं. अख्ख गाव ऊस तोडायला म्हणून पश्चिम महाराष्ट्रात यायचं. अखेर सातपुते कुटुंबाने मुक्कामच माळशिरस मधल्या भाम्बुडी येथे हलवला. हे ही गाव तसं दुष्काळी पण जवळच असलेल्या साखर कारखान्यामूळ पोटापाण्याची चिंता मिटलेली. सातपुते यांना तीन मुलींच्या पाठीवर एक मुलगा झाला. नाव ठेवलं राम. गरिबीतून बाहेर पडायचं झालं तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे विठ्ठल सातपुतेना माहित होतं. म्हणूनच त्यांनी आपल्या पोरांना शिकवलं. एकवेळ उपास केला पण मुलाला इंजिनियर करायचं स्वप्न बघितलं. मुलगा ही तसाच हुशार निघाला.पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रिंटींग इंजिनियरिंगच्या कोर्ससाठी प्रवेश घेतला. सुरुवातीला माळशिरससारख्या ग्रामीण भागात शालेय शिक्षण घेणाऱ्या रामला स्वत: गरिबीतून आल्यामुळे परिस्थितीचे चटके सहन केलेले असल्यामुळे या प्रश्नाची जाण होती. त्याच गांभीर्य समजत होतं. विद्यार्थी लढ्यात काम करत असताना त्याला खरा सूर गवसला. ग्रामीण भागातून आलेल्याच दडपण त्याने झुगारून दिले.मोठ्या सभांमधून आत्मविश्वासाने आपल म्हणण मांडू लागला. सर्व स्तरातून आलेल्या मुलांशी सहजपणे कनेक्ट होण्याची हातोटी त्याला विद्यार्थ्यांचा लढा उभारताना उपयोगाला झाली. पुणे विद्यापीठात त्याने केलेली आंदोलने यशस्वी झाली. बरीच प्रश्ने सोडवता आली. त्याची दखल अभाविपच्या नेतृत्वाने घेतली.राम सातपुतेंना वेळोवेळी मोठमोठ्या जबाबदाºया देण्यात आल्या. आंदोलनानंतर नक्षलवाद व शहरी नक्षलवाद हा प्रश्न प्रामुख्याने माध्यमांमध्ये चर्चेत आला होता. यावेळी राम सातपुतेंनी या विषयावर सखोल अभ्यास केला. रामचं वक्तृत्व, त्याचा अभ्यास, सहज सोप्या भाषेत व्यक्त करण्याची क्षमता यामुळे संघ परिवारच्या वेगवेगळ्या कार्यक्रमात त्याला शहरी नक्षलवाद हा विषय मांडायची जबाबदारी देण्यात आली. यातूनच त्याचे नेतृत्व घडत गेले आणि आमदारकी मिळवण्यात यश मिळाले.विधानसभेसाठी राखीव मतदारसंघ असणा-या माळशिरस मधून भाजपचे तिकीट कोणाला द्यायचे, हे निश्चित होत नव्हते. मात्र, स्वत: मुख्यमंत्र्यांनी आपल्या विश्वासातील असणा-या या युवा नेत्याला तिकीट देऊन सगळ्यांना धक्का दिला. त्याचा फॉर्म भरण्यासाठी स्वत: विजयसिंह मोहिते पाटील हजर होते. एकेकाळी त्यांच्याच कारखान्यामध्ये आठ वर्ष राम सातपुतेंचे आईवडील ऊसतोडणी कामगार होते. रामच्या उमेदवारीमुळे एक वर्तुळ पूर्ण होतंय. आज ही त्याचे वडील डोईठाण गावात चपला शिवायचे काम करतात. तर त्याच्या आईला जिजाबाई सातपुते यांना आपला मुलगा आमदार होणार म्हणजे काय होणार, हे देखील माहीत नव्हते.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019MLAआमदारElectionनिवडणूकLabourकामगार