शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

चोराचा ७ जिल्ह्यांत धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:39 IST

बीड : गर्दी, कार्यक्रम, घरासमोर उभा केलेल्या दुचाकी चोरून परजिल्ह्यात विक्री करणाऱ्या कालिदास लहुजी झिंजुर्डे (रा.नागडगाव ह.मु.गोविंदपुर ता.माजलगाव) या अट्टल चोराच्या स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून १४ लाख रूपये किंमतीच्या तब्बल २७ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या दुचाकीचोराने एक दोन नव्हे तर तब्बल सात जिल्ह्यात धुमाकूळ घातला ...

ठळक मुद्देएलसीबीने आवळल्या मुसक्या : २७ दुचाकी जप्त; टोळीतील साथीदारांचा शोध सुरू

बीड : गर्दी, कार्यक्रम, घरासमोर उभा केलेल्या दुचाकी चोरून परजिल्ह्यात विक्री करणाऱ्या कालिदास लहुजी झिंजुर्डे (रा.नागडगाव ह.मु.गोविंदपुर ता.माजलगाव) या अट्टल चोराच्या स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून १४ लाख रूपये किंमतीच्या तब्बल २७ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या दुचाकीचोराने एक दोन नव्हे तर तब्बल सात जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. अखेर बीड पोलिसांनीच सापळा लावून त्याला बेड्या ठोकल्या.

कालिदास हा दुचाकी चोरण्यात पटाईत आहे. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील बीडसह परभणी, उस्मानाबाद, जालना, लातूर, नांदेड, अहमदनगर अशा जिल्ह्यांमधून त्याने दुचाकी पळविलेल्या आहेत. दुचाकी चोरांची एक टोळी असून कालिदास हा त्याचा म्होरक्या आहे. दिवसेंदिवस दुचाकी चोरीच्या घटना वाढत गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.

तर चोरट्यांचा शोध लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. राज्यातील पोलीस कालिदासच्या मागावर होती. परंतु तो हाती लागत नव्हता. मंगळवारी तो माजलगावहून गोविंदपुरला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांना मिळाली. त्यांनी सपोनि दिलीप तेजनकर व त्यांच्या टिमला सापळा लावण्यास सांगितले.

दुचाकीवरून जात असतानाच त्याचा पाठलाग करून तेजनकर यांनी त्याला बेड्या ठोकल्या. चौकशीत पोलिसी खाक्या दाखविताच तो पोपटासारखा बोलू लागला. त्याने आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली. त्याच्याकडून आतापर्यंत तब्बल २७ दुचाकी जप्त केल्या आहेत. त्याच्या इतर साथीदारांचाही शोध सुरू असल्याचे पोनि पाळवदे यांनी सांगितले. लवकरच टोळीचा पर्दाफाश केला जाईल, असेही ते म्हणाले. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि घनश्याम पाळवदे, सपोनि दिलीप तेजनकर, विकास वाघमारे, नसिर शेख, विष्णू चव्हाण, सतीश कातखडे, संतोष म्हेत्रे, गोविंद काळे, सुग्रीव रूपनर, भागवत बिक्कड आदींनी केली.

सहा तालुक्यांतील १० गुन्हे उघडगेवराई पोलीस ठाणे हद्दीत पाच, केज, धारूर, आष्टी, गोंदी व कळंब पोलीस ठाणे हद्दीतील तब्बल १० गुन्हे उघड झाले आहेत.

टॅग्स :BeedबीडThiefचोरCrimeगुन्हाMarathwadaमराठवाडा