शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

बीडजवळच्या गोरेवस्तीवर सशस्त्र दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 00:12 IST

शहराजवळील गोरे वस्तीवरील जगताप यांच्या घरावर दरोडा टाकून सदस्यांवर शस्त्राने हल्ला करत ५० हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना सोमवारी पहाटे घडली.

ठळक मुद्देपोलिसांनी केली संशयितांची चौकशी : पुर्ववैमनस्य की दरोडा? पोलीस करत आहेत तपास

बीड : शहराजवळील गोरे वस्तीवरील जगताप यांच्या घरावर दरोडा टाकून सदस्यांवर शस्त्राने हल्ला करत ५० हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. यातील जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचा संशय कुटुंबियांना असल्याने हा दरोडा आहे की वैयक्तिक वादातून झालेला प्रकार आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.लोभाजी जगताप, पत्नी मीनाबाई व मुलगा अशोक हे घरात झोपलेले होते. रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास १० ते १२ अनोळखी लोकांनी घरात प्रवेश केला. जगताप यांच्या मुलाला काठीने व कोयत्याने मारहाण सुरु केली. यात अशोकचा हात फॅक्चर झाला. त्यांच्याकडे भाड्याने राहणाऱ्या आशाबाई मोराळे व त्यांचा मुलगा विकास यालाही मारहाण करुन जखमी केले. तसेच त्यांचे हात व पाय बांधून ठेवले. मारहाणीनंतर घरातील सोन्याचे दागिने व रोख असा एकूण ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. यातील आरोपी हे २० ते ३० वयोगटातील असल्याचे फिर्यादीकडून सांगण्यात आले आहे. त्यानंतर बºयाच वेळाने एकाचा हात सुटल्यानंतर पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. ग्रामीण ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुजित बडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पहाटेच्या सुमारास घटनास्थळी धाव घतली. त्यानंतर जखमींना जिल्हा रुग्णालयात हलवले. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर मीनाबाई जगताप यांच्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण ठाण्यात १०-१२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास सोपनि सुजित बडे हे करत आहेत. दरम्यान फिर्यादीने ज्यांच्यावर आरोप केले आहेत, त्यांची चौकशी करण्यात आली.मामाच्या फोनवरून पोलीस पोहचले घटनास्थळीघरातील सदस्यांना मारहाण केल्यानंतर बांधून ठेवले होते. सर्व मुद्देमाल घेऊन दरोडेखोर लंपास झाल्यानंतर भितीचे वातावरण होते. यावेळी यांच्यातील एकाने आपले हात कसेबसे सोडवले व मामाला फोन करुन सर्व प्रकार सांगितला. त्यांचे मामा हे मुंबई येथे होते, त्यांनी पोलीस कंट्रोलला फोन करून सर्व घटनेची माहिती दिली. त्यानंतर बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कार्यवाही केली.

टॅग्स :BeedबीडRobberyचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस