चारा छावण्यांच्या मंजुरीसाठी धस-धोंडे यांच्यात सत्तासंघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 11:40 PM2019-03-14T23:40:37+5:302019-03-14T23:41:11+5:30

आष्टी विधानसभा मतदार संघाचे आमदार भीमराव धोंडे व आ. सुरेश धस हे आता जरी भारतीय जनता पक्षात एकत्र काम करत असले तरी देखील त्यांच्यातील सत्ता संघर्ष संपूर्ण जिल्ह्याने बघितलेला आहे.

For the approval of fodder camps, Dhas Dhonde has power struggle | चारा छावण्यांच्या मंजुरीसाठी धस-धोंडे यांच्यात सत्तासंघर्ष

चारा छावण्यांच्या मंजुरीसाठी धस-धोंडे यांच्यात सत्तासंघर्ष

Next
ठळक मुद्देताण वाढला : सुरेश धस, भीमराव धोंडेनी घेतली अधिकाऱ्यांची भेट; सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या कार्यालयात चकरा

बीड : आष्टी विधानसभा मतदार संघाचे आमदार भीमराव धोंडे व आ. सुरेश धस हे आता जरी भारतीय जनता पक्षात एकत्र काम करत असले तरी देखील त्यांच्यातील सत्ता संघर्ष संपूर्ण जिल्ह्याने बघितलेला आहे. चारा छावणी मंजुरीवरुन पुन्हा एकदा हा संघर्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे. धस यांच्या कार्यकर्त्यांच्या छावण्या सर्वाधिक मंजूर झालेल्या असून आ.धोंडेचे कार्यकर्ते मात्र अजू प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे, त्यामुळे आ.भीमराव धोंडे यांनी गुरुवारी याच विषयावर चर्चा करण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांण्डेय यांची भेट घेल्याची माहिती आहे.
दुष्काळी परिस्थितीमध्ये चारा छावण्या व टँकर याची सर्वांत जास्त संख्या बीड व त्यानंतर आष्टी, पाटोदा, शिरुर, वडवणी या तालुक्यात आहे. यावर्षी देखील पालकमंत्र्यांनी संमती दिलेल्या जवळपास ३४० छावण्या मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एकट्या आष्टी तालुक्यात ७२ चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी संमती दिलेल्या बहूतांश चारा छावण्या या आ.सुरेश धस समर्थकांच्या आहेत. तर आ.भीमराव धोंडे यांचे समर्थक कार्यकर्ते मात्र अजून देखील चारा छावणी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.
त्यामुळे आ.धोंडे यांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चारा छावणी मंजूर करताना सर्वांना सामावून घेण्याविषयी चर्चा केल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चारा छावण्यांच्या मंजुरीवरुन आ. भीमराव धोडे व विधान परिषदेवरील आ. सुरेश धस यांच्यातील पक्षाअंतर्गत संघर्ष व कुरघोडीचे राजकारण जिल्ह्याला पाहायला मिळत आहे.
चारा छावणी मंजुरीत सुरेश धस यांना अधिक रस
आष्टी तालुक्यात ७२ चारा छावण्यांना मंजुरी मिळाली आहे, त्यानंतर ६३ छावण्याची यादी मंजुर करण्यासंदर्भातत आ. सुरेश धस हे प्रशासकीय अधिकाऱ्यांपाशी रात्री १२ वाजेपर्यंत बसले होते. अशी माहिती खात्रीशीर सूत्रांनी दिली आहे. मात्र इतर मतदा संघाच्या तुलनेत आ. सुरेश धस यांनी चारा छावणी मंजुरीच्या संदर्भात अधिक रस घेल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यापुर्वी छावण्यांध्ये जे झालं तेच होणार असल्याची चर्चा आहे, त्यावेळी जिल्हाधिकारी सुनिल केंद्रेकर होते. ते आता विभागीय आयुक्त असल्यामुळे शेण उरेल अशी देखील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कार्यकर्ते चर्चा करत होते.

Web Title: For the approval of fodder camps, Dhas Dhonde has power struggle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.