....
कड्याचा पाणीप्रश्न कधी मिटणार
कडा : आष्टी तालुक्यातील कडा गावात गेल्या तीस वर्षांत अनेक पाणी योजना झाल्या. परंतु येथील योजना पाण्याअभावी बंद पडल्या. तीस वर्षांपूर्वी कडा येथे पिण्याच्या पाण्याची जी परिस्थिती होती, तीच आज आहे. याला लोकप्रतिनिधींची उदासीनता कारणीभूत आहे. तरी कडा येथेही कायमस्वरूपी पाणी योजना राबवावी, अशी मागणी होत आहे.
....
पिंपरखेड-वाघळूज तांडा रस्ता दुरुस्तीची मागणी
धानोरा : पिंपरखेड ते वाघळूज तांडा दरम्यान रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम तीन वर्षांपूर्वी मंजूर केले होते. हे काम आतापर्यंत का झाले नाही? असा सवाल नागरिकांतून होत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या रस्त्यावरून प्रवास करणे नागरिकांना मुश्कील होते. तरी या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे.
....
रस्ता रुंदीकरणाची मागणी
धानोरा : मांदळी-धानोरा-सावरगाव रस्त्याचे रुंदीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. या रस्त्यावरून श्रीक्षेत्र मांदळी, सावरगाव येथील श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ, मढी, पैठण येथे भाविक मोठ्या प्रमाणात जातात. यामुळे गेल्या काही वर्षांत या रस्त्यावर वर्दळ वाढली आहे. तरी या रस्त्याचे रुंदीकरण करावे, अशी मागणी होत आहे.
...
रेल्वे पुलाखालील रस्त्यांमुळे वाहतुकीस अडथळा
बीड : जिल्ह्यात नगर-परळी रेल्वेमार्गाचे काम सुरू आहे. या कामात अनेक ठिकाणी उड्डाणपूल, भुयारी मार्ग काढले आहेत. काही ठिकाणी पुलांची कामे पूर्ण झाली आहेत, तर अनेक महामार्गावर असणारे पूलही पूर्णत्वास आले आहेत. परंतु या पुलाखालील रस्त्यावर खड्डे, गतिरोधक तयार केले आहेत. हे गतिरोधक लेव्हलमध्ये नसल्याने अनेक चारचाकी वाहने, दुचाकीस्वारांना अंदाज येत नाही. यामुळे या ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तरी या ठिकाणी रस्ता दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
.....
शाळा परिसरात गवत वाढले
बीड : जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा अनेक दिवसांपासून बंद आहेत. यामुळे शाळेचे वर्ग अनेक दिवस उघडले नाही. तसेच शाळेच्या आवारात स्वच्छता केलेली नाही. तरी शाळा परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी पालकांतून होत आहे.
.....
पिकांना जीवदान
बीड : पाटोदा तालुक्यातील सौताडा, धनगर जवळका परिसरात गेल्या चार दिवसांत काही ठिकाणी भीज पाऊस झाला, तर काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. खरिपाच्या पेरणीनंतर पावसाने १५ दिवस दडी मारली होती. दरम्यान, गेल्या चार-पाच दिवसांत काही ठिकाणी पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
......