जिल्ह्यामध्ये कोरोना महामारीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये रुग्णांची संख्या मोठ्या वेगाने वाढत असून, ग्रामीण भागांमध्येदेखील या साथ रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. शासन आणि आरोग्य प्रशासनावर या महामारीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी मोठा ताण पडत आहे. या किट्सचा तुटवडा जाणवत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांच्या टेस्ट कमी प्रमाणावर होत आहेत. त्यामुळे या ग्रामीण भागात निदान होण्यापूर्वीच काही मृत्यू झाल्याचे विदारक चित्र समोर येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील टेस्ट आणि आर. टी. पी. सी. आर. टेस्ट किट्स मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होण्यासाठी निविदा प्रकाशित केल्याचे समजते. तथापि या किट्स तत्काळ उपलब्ध करण्यासंबंधी आरोग्य विभागाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत आ. सुरेश धस यांनी व्यक्त केले आहे.
अँटिजेन, आर. टी. पी. सी. आर. किट तत्काळ उपलब्ध करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:36 IST