शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीला आणखी एक झटका? माजी मंत्री करणार भाजपात प्रवेश, मुख्यमंत्र्यांनी आखली रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 13:54 IST

राष्ट्रवादी काँग्रेसमधील आणखी एक मोठा नेता भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

बीड -  राष्ट्रवादी काँग्रेसमधील आणखी एक मोठा नेता भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयदत्त क्षीरसागर हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा सध्या बीडमध्ये जोर धरु लागली आहे.काल जयदत्त क्षीरसागर यांच्या घरी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन आणि बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी उपस्थिती लावली. त्यामुळे नाराज क्षीरसागर भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने बीड राष्ट्रवादीची धुरा संदीप क्षीरसागर यांच्याकडे दिली आहे. त्यामुळेही जयदत्त क्षीरसागर सध्या राष्ट्रवादीपासून लांब आहेत.बीडमधील एका वृत्तपत्राच्या सुवर्ण मोहत्सव सोहळ्याला मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावली.  यावेळी मंचावर मुख्यमंत्र्यांसोबत जयदत्त क्षीरसागर हे सुद्धा दिसले. याशिवाय स्टेजवर, पंकजा मुंडे, गिरीष महाजन, आमदार पाशा पटेल, विनायक मेटे यांचीही उपस्थिती होती. 

कोण आहेत जयदत्त क्षीरसागर?जयदत्त क्षीरसागर हे बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री  होते. 

काका- पुतण्याचा वादजयदत्त क्षीरसागर यांचा आणि त्यांचा पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्यात वाद आहेत. बीडमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत क्षीरसागर काका-पुतण्याचा वाद टोकाला गेला होता. संदीप क्षीरसागर यांनी त्यांचे काका, आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. काकू नाना विकास आघाडीच्या माध्यमातून संदीप क्षीरसागर यांनी जिल्हा परिषदेसाठी उमेदवार उभे केले आहेत. राजुऱ्यात मतदानादरम्यान माझ्या उमेदवाराला जयदत्त क्षीरसागर यांनी धमकी दिली, असा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केला होता.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा