माजलगाव (बीड): माजलगाव नगरपालिकेत सत्तेची सूत्रे हाती येऊन महिनाही उलटला नाही, तोच नगराध्यक्षांच्या पतीची 'दादागिरी' समोर आली आहे. पीटीआर विभागातील कामावरून झालेल्या वादातून नगराध्यक्षांचे पती बिलाल सहाल चाऊस यांनी पालिका कर्मचारी अक्षय धारक यांना नगरपालिकेतच बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी दुपारी घडली.
दोन महिन्यापूर्वी येथील नगरपालिकेच्या निवडणुका होऊन शिफा बिलाल चाऊस या निवडून आल्या होत्या. त्यांनी पदभार घेऊन एक महिनाच उलटला नाही तोच नगराध्यक्षांचे पती बिलाल सहाल चाऊस यांनी नगरपालिकेतील आस्थापना विभागातील कर्मचारी अक्षय धारक यांना पीटीआर द्यायला पैसे का मागितलेस म्हणून नगरपालिकेत येत अक्षय धारक यांनाखाली बोलावून त्यांच्या श्रीमुखात भडाकावली त्यानंतर त्यांच्या साथीदाराने त्यास लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली.
हा प्रकार चालू असताना येथे कामानिमित्त आलेल्या नागरिकांनी हे भांडण सोडवले व पुढे होणारा अनर्थ टाळला. याप्रकरणी शहर पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. कर्मचाऱ्यास मारहाण केल्यानंतर इतर कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नगराध्यक्ष पतीची दादागिरी सहन केली जाणार नसल्याचे कर्मचाऱ्यांमधून सांगण्यात येत आहे. पुन्हा असा प्रकार झाल्यास आम्ही आंदोलन छेडणार असल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला.
पदाधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांवर वचक नाही नगरपालिकेतील कर्मचारी बिन बोभाट पणे पैसे मागत आहेत यावर नगराध्यक्ष , उपाध्यक्ष व निवडून आलेल्या नगरसेवकांचा वचक राहिला नाही का ? नगराध्यक्ष पतीने कर्मचाऱ्यास मारहाण केली हा प्रकार योग्य नाही व पदाधिकाऱ्यांनी अशा कर्मचाऱ्यांना नोटीस बजावणी आवश्यक होते.-ज्ञानेश्वर मेंडके , भाजपा नेते
नियमानुसार काम करत होतोमाझ्याकडे आस्थापना विभाग असून पीटीआर विभागातील माणूस सुट्टीवर असल्यामुळे मला त्या ठिकाणी बसवण्यात आले होते. मी संबंधितांना पीटीआर दिली व नियमानुसार शंभर रुपयाची पावती फाडण्यास सांगितले. म्हणून बिलाल चाऊस व त्याच्या साथीदारांनी मला नगरपालिकेत येऊन मला पाच-सहा चापटा मारल्या.- अक्षय धारक , कर्मचारी न.प. माजलगाव
Web Summary : In Majalgaon, the municipality president's husband, Bilal Chaus, assaulted an employee, Akshay Dharak, for requesting payment receipts. The incident sparked outrage among employees, who threatened protests against such behavior. A BJP leader criticized the lack of oversight in the municipality.
Web Summary : माजलगाँव में, नगर पालिका अध्यक्ष के पति बिलाल चाऊस ने रसीद मांगने पर कर्मचारी अक्षय धारक पर हमला किया। इस घटना से कर्मचारियों में आक्रोश फैल गया, जिन्होंने इस तरह के व्यवहार के खिलाफ विरोध प्रदर्शन की धमकी दी। एक भाजपा नेता ने नगर पालिका में निगरानी की कमी की आलोचना की।