शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

अंगणवाडी सेविकांचा एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2023 18:36 IST

नादुरुस्त मोबाईल जमा करून दिले बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना निवेदन 

- अविनाश कदम आष्टी ( बीड) : विविध मागण्यांसाठी आष्टी तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयावर आज दुपारी २ वाजता मोर्चा काढला. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चानंतर अंगणवाडी सेविकांनी नादुरुस्त मोबाईल जमा करून अधिकाऱ्यांना निवेदन दिले. 

महाराष्ट्र शासनाने सन २०२२ च्या बजेट अधिवेशनात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मोबाईल घेण्यास दहा हजार रुपये खर्चास मंजुरी दिली आहे. मात्र, अद्याप यावर अंमलबजावणी झाली नाही. यामुळे नवीन मोबाईल देत नाहीत तोपर्यंत जुन्या मोबाईलवर काम बंद चालू राहील असा इशारा निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने आष्टी तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविकांनी दिला आहे. तसेच सर्व अंगणवाडी सेविकांनी मोबाईल बाल प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयात जमा केले आहेत. यावेळी प्रा गनीभाई शेख,आशा शेंडगे ,शोभा साठे,नसिंम सय्यद, उषा राऊत, रत्नमाला लाहोर,आशा वखरे,अलका सानप,रामकवर भोगाडे, संगीता गरुड, सुशीला बांगर, मथुरा कुत्तरवाडे,आर बी लोहार, रेश्मा चौधरी, वैशाली सुंबरे, सविता थोरवे,बिबी बेग,कुसुम थोरवे, यांच्यासह तालुक्यातील सर्वच अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या.

नादुरुस्त मोबाईलचा भुर्दंड सेविकांनाआष्टी तालुक्यात सन २०२१ मध्ये देण्यात आलेले मोबाईल निकृष्ट दर्जाचे असून ऑनलाईन कामकाजासाठी कुचकामी ठरले आहेत. या मोबाईलची वारंटी संपलेली असून हँग होणे, डिस्प्ले जाणे, बंद पडणे, चार्जिंग न होणे असे प्रकार सातत्याने घडत आहेत. या मोबाईल दुरुस्तीचा खर्च अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाच बसत आहे.

टॅग्स :Beedबीडagitationआंदोलन