शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

...अन 'तो' तरुण भाकरीचं नव्हे तर पैशाचं गाठोडं घेऊन भर चौकात उभा होता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 18:26 IST

जनजागृती करूनही नागरिकांचा गाफिलपणा कायम

ठळक मुद्देपोलिसांकडून कानउघडणी केल्यानंतर नातेवाईकांना बोलावले साडे अकरा वाजण्याच्या सुमारास नगर नाक्यावरील मुख्य चौकात उभा होता.

बीड : खिशात दहा रूपये जरी असले तरी काही लोक वारंवार खिसा तपासतात. मात्र मंगळवारी बीडमधील नगर नाक्यावरील मुख्य चौकात वेगळाच अनुभव आला. भाकरीचं जसं गाठोडं घेऊन उभा रहावे, तसेच एक व्यक्ती ५००, १०० च्या नोटांच्या बंडलचे गाठोडं घेऊन उभा होता. ही बाब पेट्रोलींग करणाऱ्या पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्याची चांगलीच कानउघडणी केली. एकीकडे पोलिसांकडून जनजागृती केली जात असतानाही काही नागरिक मात्र आजही किती गाफिल आहेत, याचा प्रत्यय या घटनेवरून येतो. 

सुनील (नाव बदललेले) हा ३३ वर्षीय तरूण मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास नगर नाक्यावरील मुख्य चौकात उभा होता. त्याने बँकेतून जवळपास दोन लाख रूपये काढून आणले. मित्राच्या प्रतिक्षेत असलेल्या सुनिलकडे गस्त घालणारे स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि अमोल धस यांचे लक्ष गेले. त्यांनी तात्काळ त्या व्यक्तीकडे धाव घेतली. त्याला समजावून सांगण्याबरोबरच चांगलीच कानउघडणी केली. पोलिसांच्या सुचनेनंतर त्याने आपल्या नातेवाईकाला बोलावून घेतले आणि तेथून माजलगावला मार्गस्थ झाला.

दरम्यान, चोरी, घरफोडी, लुटमार यासारख्या घटनांपासून सावध राहण्याबाबत पोलिसांकडून जनजागृतीसह आवाहन केले जात आहे. तरी सुद्धा नागरिक गाफील रहात आहेत. त्यामुळेच चोरी, लुटमार, फसवणूक अशा घटनांना निमंत्रण मिळत आहे.

यापूर्वीही घडली होती घटनासाधारण चार महिन्यांपूर्वी सुनील उभा असलेल्या ठिकाणावरूनच कार चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली होती. या भागात चोरट्यांचा वावर असल्याचे सूत्रांनी सांगितले. हाच धागा पकडून गस्त घातली जात होती. सपोनि अमोल धस व त्यांच्या टिमच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली.

टॅग्स :MONEYपैसाBeedबीडPoliceपोलिस