शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

डोक्यात दगड घालून ८० वर्षीय वृद्धाचा खून; पती-पत्नीला जन्मठेपेची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 19:07 IST

अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

अंबाजोगाई - जुन्या आर्थिक वादातून ८० वर्षीय वृद्धाचा काठ्या आणि दगडाने मारहाण खून केल्याच्या आरोपावरून दाखल गुन्ह्यात अंबाजोगाई सत्र न्या. डी.डी. खोचे यांनी आरोपी पती-पत्नीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दारूच्या नशेत तोल जाऊन पडल्याने वृद्धाचा मृत्यू झाल्याचा बचाव आरोपींनी केला होता, मात्र प्रबळ युक्तिवादासह सहा. सरकारी अभियोक्ता लक्ष्मण फड यांनी त्यांचा दावा खोडून काढला. 

अशी घडली होती घटनाखुनाची ही घटना सहा वर्षापूर्वी अंबाजोगाई तालुक्यातील राक्षसवाडी येथे घडली होती. ८ मार्च २०१६ रोजी बळीराम दाजीबा वाघमोडे (वय ८०) हे सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास राक्षसवाडी येथील स्वतःच्या घरासमोर ओट्यावर बसले होते. यावेळी आरोपी रामप्रसाद भीमराव गडदे आणि त्याची पत्नी आशाबाई हे तिथे आले. जुन्या आर्थिक वादाचे कारण काढून रामप्रसादने सोबत आणलेल्या काठीने बळीराम यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीत त्यांचे हात-पाय फ्रॅक्चर झाले. त्याचवेळी आशाबाईने जवळ पडलेला दगड उचलून बळीराम यांच्या डोक्यात घातला. मारहाणीत जबर जखमी झालेल्या बळीराम यांचा स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु असताना रात्री ११ वा. यांचा मृत्यू झाला. 

पीआय सोमनाथ गिते यांनी केला तपाससदरील प्रकरणात ९ मार्च रोजी मयत बळीराम पत्नी हौसाबाई यांच्या फिर्यादीवरून रामप्रसाद आणि आशाबाई या दोघांवर कलम ३०२, ३२३, ३४ अन्वये ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद झाला. तत्कालीन पोलीस निरिक्षक सोमनाथ गिते यांनी दोन्ही आरोपींना ताबडतोब ताब्यात घेतले. बारकाईने या गुन्ह्याचा तपास करून गित्ते यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. दरम्यानच्या काळात आरोपी जामिनावर बाहेर होते. 

सरकारी वकिलांचा प्रबळ युक्तिवादया प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्या. डी.डी. खोचे यांच्या न्यायालयासमोर झाली. एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. मयत बळीराम वाघमोडे यांनी मद्य प्राशन केल्याचे शासकीय कागदपत्रातही निष्पन्न झाले होते, तसेच आरोपी रामप्रसाद याच्या अंगावरही जखमा होत्या. याचा फायदा घेत आरोपींनी बळीराम यानेच रामप्रसादला काठीने मारले आणि मारत असताना मद्याच्या नशेत तोल जाऊन ते खाली पडले आणि डोक्याला मार लागून त्यांचा मृत्यू झाला असा बचाव केला होता. मात्र, बळीराम यांनी अत्यल्प मद्य प्राशन केले होते, आणि तेवढ्या कमी मद्याच्या अंमलाखाली तोल जाऊ शकत नाही असे डॉक्टरांच्या साक्षीने सहा. सरकारी अभियोक्ता लक्ष्मण फड यांनी सिद्ध केले. सरकारी वकिलांचा प्रबळ युक्तिवाद आणि मयताची पत्नी हौसाबाई, नात स्वाती रामचंद्र वाघमोडे व अप्पाराव बाबुराव वाघमोडे या प्रत्यक्षदर्शींची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने रामप्रसाद आणि आशाबाई गडदे यांना दोषी ठरवले.

दांपत्याला जन्मठेपसदरील प्रकारांत न्यायालयाने आरोपी पती-पत्नीस खुनाच्या आरोपाखाली जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंड तर पतीला वाचविण्यासाठी मध्ये आलेल्या हौसाबाईला मारहाण केल्याप्रकरणी आशाबाईला एक वर्ष शिक्षा आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. याप्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने लक्ष्मण फड यांनी काम पहिले. तर, पैरवी अधिकारी म्हणून गोविंद कदम आणि कोर्ट ड्युटी शीतल घुगे यांनी कर्तव्य बजावले.

टॅग्स :Courtन्यायालयBeedबीडCrime Newsगुन्हेगारी