शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाई पंचायत समिती  प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 00:35 IST

महाराष्ट्र शासनाच्या वतीने २०१६-१७ सालासाठी राज्यातील उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या पंचायत समित्यांना राज्यस्तरीय व विभागीयस्तरावर पारितोषिके जाहीर करण्यात आली. त्यात अंबाजोगाई पंचायत समितीला विभागीयस्तरावरील प्रथम क्रमांकाचा १२ लाख रु पयांचा ‘यशवंत पंचायत राज अभियान’चा पुरस्कार जाहीर झाला आहे.

ठळक मुद्देयशवंत पंचायतराज अभियान : शासनाकडून १२ लाखांचा पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : महाराष्ट्र शासनाच्या वतीने २०१६-१७ सालासाठी राज्यातील उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या पंचायत समित्यांना राज्यस्तरीय व विभागीयस्तरावर पारितोषिके जाहीर करण्यात आली. त्यात अंबाजोगाईपंचायत समितीला विभागीयस्तरावरील प्रथम क्रमांकाचा १२ लाख रु पयांचा ‘यशवंत पंचायत राज अभियान’चा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर आठ लाखांचा द्वितीय पुरस्कार परळी पंचायत पं.स.ला जाहीर झाला आहे.अंबाजोगाई पं.स.चे गटविकास अधिकारी दत्ता गिरी यांच्या कुशल प्रशासनाखाली सर्व कर्मचारी वर्गाने स्वच्छता, पं.स.चे सर्व रेकॉर्ड अद्यावत ठेवणे या बाबींवर विशेष भर दिला. या मुद्यांच्या आधारेच हे पुरस्कार दिले जातात.सदरील सर्व बाबतीत परिपूर्ण असल्याचे निदर्शनास असल्याने अंबाजोगाई पंचायत समितीला हा बहुमान प्राप्त झाला आहे. याकामी गटविकास अधिकारी गिरी यांना अंबाजोगाई पं.स.चे तत्कालीन सीडीपीओ विठ्ठल नागरगोजे, शाखा अभियंता आर.बी. काळे, पं.स. कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राहुल देशमुख, कक्षाधिकारी नीलकंठ दराडे, अधीक्षक तुकाराम झाडे, ग्रामसेवक संघटना तसेच सर्व कर्मचारी आणि सेवकांचे योगदान लाभले. पं.स. सभापती मीना भताने, उपसभापती तानाजी देशमुख आणि इतर सर्व सदस्यांनी अधिकारी, कर्मचाºयांना प्रोत्साहन दिले. लवकरच मुंबई येथे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार असल्याचे आहे. मागील वर्षी अंबाजोगाई पंचायत समितीला विभागात द्वितीय पारितोषिक मिळाला होता. या कामगिरीचे कौतुक होत आहे.पं.स.चा रेकॉर्ड अद्यावत ठेवण्यावर भरअंबाजोगाई पं.स.चे गटविकास अधिकारी दत्ता गिरी यांच्या कुशल प्रशासनाखाली सर्व कर्मचारी वर्गाने स्वच्छता, पं.स. चे सर्व रेकॉर्ड अद्यावत ठेवणे या बाबींवर विशेष भर दिला. या मुद्यांच्या आधारे हा पुरस्कार दिला गेलायाबाबींची खातरजमा केल्याचे निदर्शनास आल्याने अंबाजोगाई पं.स.ला हा बहुमान प्राप्त झाला आहे.

टॅग्स :BeedबीडAmbajogaiअंबाजोगाईpanchayat samitiपंचायत समिती