शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत साडेतीन लाखांचा गुटखा पकडला; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 18:48 IST

जीपसह चालक ताब्यात

अंबाजोगाई (बीड ) : गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी अंबाजोगाई शहरात एका जीपमधून ३ लाख ३६ हजारांचा गुटखा जप्त केला. यावेळी चारचाकी वाहनासह चालकास ताब्यात घेऊन अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. 

राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा छुप्या मार्गाने अंबाजोगाई शहरात येत असल्याची गुप्त माहिती अन्न व औषध प्रशासन विभागास प्राप्त झाली होती. सदर माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनचे सहा. आयुक्त कृष्णा दाभाडे, अधिकारी ऋषिकेश मरेवार, अंबाजोगाई शहरचे पोलीस उपनिरीक्षक कांबळे यांच्या पथकाने  पाळत ठेऊन संशयास्पदरीतीने अंबाजोगाईत आलेल्या जीपला (एमएच १२ केएन १५५४) लोखंडी सावरगाव रोडवर अडविले. गाडीची झडती घेतली असता आतमध्ये सुमारे ३ लाख ३६ हजार रुपये किमितीचे एक्का कंपनीच्या गुटख्याचे एकूण ३२ पोते आढळून आले. सदर वाहनाचा चालक शेख शाहेबाज फारूक (रा. फुले नगर, केज) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुटखा कुठून आणला आणि कुठे देणार होता याबाबत चौकशी केली असता त्याने माहिती देण्यास नकार दिल्याने पथकाने त्याच्याकडील मोबाईल जप्त केला. दरम्यान, गुटखा आणि चारचाकी वाहन आणि मोबाईल असा एकूण ८ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चालक शेख शाहेबाज याच्यावर अंबाजोगाई शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

सहा. आयुक्त दाभाडे यांची आठवड्यात दुसरी कारवाई :बीडच्या अन्न व औषध प्रशासनच्या सहा. आयुक्तपदी कृष्णा दाभाडे यांची गत महिना अखेरीस नियुक्ती झाली. त्यानंतर शुक्रवारी त्यांनी आष्टी येथे कारवाई करत १८  लाखांचा गुटखा पकडला होता. त्यानंतर मंगळवारी अंबाजोगाईत जवळपास साडेतीन लाखांचा गुटखा पकडला. दाभाडे यांनी कारवायांचा धडाका सुरु केल्याने गुटखा माफियात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीraidधाडBeedबीड