शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बीडमध्ये कथित बोगस मतदान; पुन्हा द्यावा लागणार अहवाल, निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना मागविले स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 13:24 IST

बीड मतदारसंघात १३ मे रोजी मतदान झाले होते. भाजपच्या पंकजा मुंडे आणि शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्यात मुख्य लढत झाली. या मतदारसंघातील काही मतदान केंद्रे बळकावण्यात आली आणि तिथे मनमानी मतदान करवून घेण्यात आले, अशा तक्रारी आहेत.

मुंबई : बीड लोकसभा मतदारसंघात काही ठिकाणी मतदान केंद्रे बळकावून बोगस मतदान केल्याच्या तक्रारींबाबतचा अहवाल तेथील जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांच्याकडे पाठविला आहे. मात्र, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांना आणखी काही मुद्द्यांबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. आयोगाच्या सूत्रांनी ही माहिती दिली.  

बीड मतदारसंघात १३ मे रोजी मतदान झाले होते. भाजपच्या पंकजा मुंडे आणि शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्यात मुख्य लढत झाली. या मतदारसंघातील काही मतदान केंद्रे बळकावण्यात आली आणि तिथे मनमानी मतदान करवून घेण्यात आले, अशा तक्रारी आहेत. बजरंग सोनवणे यांनी काही गावांची यादी देऊन तेथे असे प्रकार घडल्याचे म्हटले होते.  या संबंधीचे काही व्हिडीओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झालेले होते. या व्हिडीओंची तसेच सोनवणेंच्या तक्रारीची दखल घेत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्यास गेल्या आठवड्यात सांगितले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी प्राथमिक अहवाल सादर केला आहे. मात्र, या अहवालातील काही मुद्द्यांवर आणखी स्पष्ट माहिती द्या, असे आदेश मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, असे सूत्रांनी सांगितले. बीडमध्ये प्रत्यक्ष मतदानावेळी गडबडी झाल्याच्या तक्रारी आहेत, तशा तक्रारी राज्यातील कोणत्याही मतदारसंघातून आलेल्या नाहीत, असे आयोगाने स्पष्ट केले. 

आयोगाने मागविलेली स्पष्ट माहिती बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून आल्यानंतर मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला त्याबाबतचा अहवाल पाठविण्यात येणार आहे. 

या अहवालाचा अभ्यास केल्यानंतर बीडमधील काही मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घ्यायचे की नाही, याबाबतचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग घेईल. मतदान केंद्रे बळकावण्याची चौकशी करावी आणि तेथे फेरमतदान घ्यावे, अशी मागणी शरद पवार गटाने आयोगाकडे केली होती.  

आयोगाकडे तक्रार नाहीअहमदनगरमध्ये विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि शरद पवार गटाचे नीलेश लंके यांच्यात लढत होत आहे. तेथे मतदानानंतर ईव्हीएम मशीन ज्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत त्या गोदामाची त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था भेदण्याचा एका व्यक्तीने प्रयत्न केला, असा आरोप लंके यांनी केला आहे. त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याशी छेडछाड करण्याचा प्रयत्न त्या व्यक्तीने केला, असा दावाही लंके यांनी केला आहे. आयोग या आरोपाची स्वत:हून दखल घेणार का, याबाबत उत्सुकता आहे. याविषयी आयोगाकडे अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही. 

बारामतीतील ‘ती’ घटनाबारामती लोकसभा मतदारसंघात मतदानानंतर ईव्हीएम पुण्यात ज्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत तेथील सीसीटीव्ही ४५ मिनिटे बंद होते, असा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आला होता. मात्र, इलेक्ट्रिक कामांसाठी केबल काढण्यात आल्यामुळे तेथील टीव्हीवर डिस्प्ले नव्हता, परंतु सीसीटीव्ही सुरूच होते, असे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BeedबीडPankaja Mundeपंकजा मुंडेbajrang sonwaneबजरंग सोनवणे